व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: स्थानिक टोपे नगर येथील म्हाडाच्या कार्यालयात कार्यरत असलेल्या महिला कार्यकारी अभियंत्याला जीवे मारण्याची धमकी दिल्याप्रकरणी शहर कोतवाली पोलिसांनी परेश कोठारी (४५, रा. रामी हेरिटेज) रा. अकोला याच्याविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे. ३५३, १८६, ५०४, ५०६ अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे.




