फिस्कुटी ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचाराची लाचलुचपत विभाग करणार चौकशी

0
759

मूल तालुक्यातील फिस्कुटी ग्राम पंचायतीतील भ्रष्टाचाराची आता लाचलुचपत विभागाने चैकशी सुरू केली असून, यामुळे ग्राम पंचायत पदाधिकाÚयात अस्वस्थता निर्माण झाली आहे. नागपूर विभागाचे अप्पर आयुक्त डाॅ. माधवी खोडे (भाप्रसे) यांनी चंद्रपूर जिल्हा परिषदेचे मुख्य कार्यपालन अधिकारी ंना श्री. नितीन गुयनुले, सरपंच इतर 1 ग्राम पंचायत फिस्कुटी यांचे प्रकरणी महाराष्ट्र ग्राम पंचायत अधिनियम 1958 चे कलम 39(1) अन्वये चैकशी अहवाल व मूळ अभिलेख सादर करण्याबाबत दिनांक 21 फेब्रुवारी 2025 रोजी आदेश दिले आहेत. या संपूर्ण भ्रष्टाचाराची लेखी तक्रार आणि पाठपुरावा मूलचे पत्रकार भोजराज गोवर्धन यांनी केला होता. श्री. गोवर्धन यांचे सततचे पाठपुराव्यामुळे फिस्कुटी ग्राम पंचायतीत घोटाळे करणाÚयांवर आता कारवाई होण्यांचे संकेत प्राप्त झाले आहे.

फिस्कुटी ग्राम पंचायतीचे सरपंच श्री. नितीन गुरनुले यांचे काळात ग्राम पंचायतीत आलेल्या निधीतून मोठ्या प्रमाणावर गैरव्यवहार केल्याचा आरोप आहे. काॅम्प्यूटर खरेदी, अस्तित्वात नसलेल्या वाचनालयाकरीता फर्नीचर खरेदी, बाजार दरापेक्षा तब्बल 8 ते 10 पट अधिक दराने फर्नीचर खरेदी, बांधकामाचे निवीदा घोटाळा यांमुळे ही ग्राम पंचायत चांगलीच चर्चेत आली होती हे विशेष!

Previous articleबुधवारला दुर्गा मंदिराचा ९ वा वर्धापन दिन सोहळा; दुर्गा मूर्तीचा होणार दुग्धाभिषेक 
Next articleअपघातात एक जागीच ठार तर दुसरा गंभीर जखमी

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here