परमिट बार आणि रेस्टॉरंटवर लावलेला १०% विक्रीकर रद्द करा – चंद्रपूर लिकर असोसिएशनची शासनाकडे मागणी

0
57

मूल, दि. १४ जुलै २०२५ – शासनाने परमिट बार आणि रेस्टॉरंट (FL-III) वर लावलेल्या १० टक्के विक्री कराविरोधात आज मूलमध्ये बार बंद ठेऊन निवेदन देण्यात आले. चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनचे जिल्हाध्यक्ष राजू मारकवार यांच्या नेतृत्वाखाली उपविभागीय अधिकारी आणि तहसीलदार यांना हे निवेदन सादर करण्यात आले. यावेळी तालुक्यातील सर्व परमिट बार व रेस्टॉरंटचे परवानाधारक मोठ्या संख्येने उपस्थित होते.

निवेदनात नमूद करण्यात आले की, शासनाने अलीकडेच १० टक्के विक्रीकर लागू केला असून, त्याचबरोबर दारूच्या दरात आणि लायसन्स शुल्कातही वाढ करण्यात आली आहे. त्यामुळे ग्राहकांवर आर्थिक भार पडल्याने त्यांनी FL-III बारमध्ये येणे टाळले आहे. परिणामी, बार व रेस्टॉरंट व्यवसाय मोठ्या अडचणीत सापडला असून, अनेक व्यावसायिक बंद होण्याच्या उंबरठ्यावर आहेत. याचा थेट फटका या ठिकाणी काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांवर पडत असून, त्यांच्या रोजीरोटीवर गदा आली आहे.

असोसिएशनच्या म्हणण्यानुसार, दरवाढ आणि कर यामुळे अवैध व्यवसायांना प्रोत्साहन मिळू शकते. त्यामुळे शासनाने FL-III वरील १० टक्के विक्रीकर तातडीने रद्द करावा, अन्यथा मोठ्या आंदोलनाची चेतावणीही देण्यात आली आहे.

Previous articleराष्ट्रवादी काँग्रेस पार्टी मुल तर्फे स्व.महेंद्र कोडापे यांच्या कुटुंबीयांना ५० हजार रुपयांची आर्थिक मदत
Next articleपरमिट बार अँड रेस्टॉरंट FLIII वर्गासाठी १० टक्के दारू विक्री शुल्क रद्द करण्याची मागणी – चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनचा तहसीलदारांना निवेदन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here