मुल: मारोडा 15 ऑगस्ट ला स्वातंत्र्यदिनानिमित्त सुट्टी असल्यामुळे मुल तालुक्यातील सोमनाथ मधिल देवस्थान आणि डोंगराच्या सानिध्यात निसर्गमय धबधब्यामुळे पर्यटन स्थळ येथे लोकांची मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. मागील वर्षी १५ ऑगस्ट ला ३० ते ४० हजार पर्यटकांनी मोठी गर्दी केली होती. सोमनाथ पर्यटन येथिल धबधबा हा मूलपरिक्षेत्र बफर क्षेत्रात येत असून सदर क्षेत्रात वन्य प्राण्यांचा वावर असल्यास वन्य प्राण्यांना त्रास होऊ शकतो. तसेच मानव वन्यजीवन सघय घडण्याची शक्यता नाकारता येत नाही. मागील वर्षी असोलामेंडा व घोडाझरी बंद असल्याने सोमनाथ येथे मोठ्या प्रमाणात तरुण जोडप्याची गर्दी जमली होती. त्यामुळे भाविकांना नाहक त्रास सहन करावा लागला. सदर ठिकाणी अनुसूचित घटना घडू नये म्हणून 15 ऑगस्ट 2025 रोजी सोमनाथ पर्यटन स्थळ बंद ठेवण्यात येत असल्याचा आदेश काढण्यात आला आहे. तरी सर्व पर्यटक भाविकांनी सहकार्य करावे असे आव्हान करण्यात आले आहे.





