परमिट बार अँड रेस्टॉरंट FLIII वर्गासाठी १० टक्के दारू विक्री शुल्क रद्द करण्याची मागणी – चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनचा तहसीलदारांना निवेदन

0
125

मूल (ता.१४ जुलै): चंद्रपूर जिल्हा लिकर असोसिएशनच्या वतीने मूल तहसील कार्यालयात तहसीलदारांना निवेदन सादर करून परमिट बार अँड रेस्टॉरंट FLIII वर्गावर शासनाने लावलेले १० टक्के अतिरिक्त विक्री शुल्क रद्द करण्याची मागणी करण्यात आली.

अध्यक्ष राजेश मारकवार यांच्या नेतृत्वात देण्यात आलेल्या या निवेदनात म्हटले आहे की, बार अँड रेस्टॉरंट सुरू करण्यासाठी सरकारने FLIII परवाना दिला आहे. परंतु यासाठी लागणारा परवाना शुल्क तसेच विविध करांच्या जोखडामुळे व्यवसाय सुरू करणे कठीण झाले आहे. यामध्ये आता शासनाने लावलेले १० टक्के अतिरिक्त शुल्क हे पूर्णपणे अन्यायकारक आहे.

निवेदनात पुढे नमूद करण्यात आले आहे की, अनेक व्यावसायिकांनी मोठी आर्थिक गुंतवणूक करून परमिट बार अँड रेस्टॉरंटची उभारणी केली असून, त्यामुळे अनेकांना रोजगार उपलब्ध झाला आहे. मात्र, सध्याच्या आर्थिक परिस्थितीत वाढीव करामुळे व्यवसाय टिकवणे अवघड झाले आहे. ग्राहकांचीही क्रयशक्ती घटली असून व्यवसायावर प्रतिकूल परिणाम होत आहे.

यामुळे शासनाने १० टक्के वाढीव विक्री शुल्क तातडीने रद्द करावे, अन्यथा मोठ्या आंदोलनाचा इशारा देण्यात आला आहे.

Previous articleपरमिट बार आणि रेस्टॉरंटवर लावलेला १०% विक्रीकर रद्द करा – चंद्रपूर लिकर असोसिएशनची शासनाकडे मागणी
Next articleआ. मुनगंटीवार यांचा भद्रावती तालुक्यातील शेतकरी आणि ग्रामस्थांच्या हक्कासाठी ठाम पाठपुरावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here