चिचाळा शाखेत शौचालयाच्या अभावामुळे ग्राहक त्रस्त – तात्काळ सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी

0
242

मूल:- चिचाळा बँक ऑफ इंडिया, चिचाळा शाखेमध्ये ग्राहकांसाठी शौचालय व मूत्रीघराच्या मूलभूत सुविधा उपलब्ध नसल्याने नागरिकांमध्ये तीव्र नाराजी पसरली आहे. दररोज शेकडो नागरिक आर्थिक व्यवहारासाठी या शाखेला भेट देतात. मात्र, अशा मूलभूत सुविधांचा अभाव स्वच्छ भारत अभियानाच्या उद्दिष्टांनाही हरताळ फासणारा ठरत आहे.

ग्राहकांनी सांगितले की, विशेषतः महिला, वृद्ध आणि आजारी व्यक्तींना यामुळे प्रचंड गैरसोयीचा सामना करावा लागत आहे. काही वेळा सार्वजनिक ठिकाणी लघुशंका करण्याची वेळ येते, ज्यामुळे गावात स्वच्छतेसह आरोग्याच्या समस्याही निर्माण होत आहेत.

या पार्श्वभूमीवर सामाजिक कार्यकर्ते सूरज टिकले यांनी शाखा व्यवस्थापकांना लेखी तक्रार सादर करत तात्काळ शौचालय व मूत्रीघर सुविधा उपलब्ध करून देण्याची मागणी केली आहे. गावकऱ्यांचीही बँक प्रशासनाकडे तीव्र अपेक्षा आहे की त्यांनी या गंभीर प्रश्नाकडे गांभीर्याने पाहावे आणि त्वरित योग्य पावले उचलावीत.

Previous articleमुल, चिमूर, सावली, सिंदेवाही, ब्रम्हपुरी, गोंडपिंपरी आणि इतर तालुक्यातील शेतकऱ्यांसाठी महत्त्वाचा निर्णय गोसिखुर्द प्रकल्पातील तलावातून पाणी सोडण्याची मागणी; धान पिकासाठी त्वरित सिंचन व्यवस्था करण्याचा आग्रह
Next articleआ. मुनगंटीवार यांनी ग्रामीण भागातील संगणक परिचालकांच्या प्रश्नांकडे वेधले सरकारचे लक्ष

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here