मूल – रक्षाबंधनाच्या निमित्ताने शूरवी महिला महाविद्यालय, मुल येथे राखी मेकिंग स्पर्धेचे आयोजन करण्यात आले. विद्यार्थिनींनी आपल्या कुशल हस्तकौशल्यातून आकर्षक व पारंपरिक राख्या साकारल्या.
या स्पर्धेत तयार केलेल्या राख्या विद्यार्थिनींनी आज माननीय आमदार सुधीर मुनगंटीवार यांना स्वतःच्या हस्ते बांधल्या. यावेळी भाऊंच्या चेहऱ्यावर आनंद झळकत होता. विद्यार्थिनींच्या कलागुणांचे कौतुक करत त्यांनी म्हटले, “या पवित्र बंधनात स्नेह, जिव्हाळा आणि संस्कृतीचे सुंदर धागे गुंफले गेले आहेत. विद्यार्थिनींची ही सर्जनशीलता रक्षाबंधनाच्या नात्याला अधिक अलौकिक करते.”
या प्रसंगी भाऊंनी विद्यार्थिनींना कौतुकाची थाप देत त्यांना प्रोत्साहन दिले. उपक्रमातून विद्यार्थिनींमध्ये सृजनशीलता, आपुलकी व परंपरेचे जतन करण्याची प्रेरणा मिळाल्याचे समाधान सर्वांच्या चेहऱ्यावर दिसत होते.





