मुल:- शहरात काल प्रशांत समर्थ यांच्या वाढदिवसा निमित्ताने आयोजित करण्यात आलेल्या रक्तदान शिबिराला उत्स्फूर्त प्रतिसाद मिळाला. स्थानिक दरार मंडळ व मित्र परीवार मुल यांच्या संयुक्त विद्यमाने हे शिबिर पार पडले. सकाळपासूनच नागरिकांची उपस्थिती लक्षणीय होती. उत्साहाने रक्तदान करण्याची इच्छा व्यक्त करत रक्तदान केले. एकूण 122 रक्तदात्यांनी आपले मौल्यवान रक्तदान करून समाजसेवेचा आदर्श ठेवला.
शिबिराचे उद्घाटन माननीय माजी खासदार हंसराज अहिर यांच्या उपस्थितीत झाले. डॉक्टर व आरोग्य कर्मचारी यांनी प्रत्येक दात्यांची तपासणी करून सुरक्षित रक्तसंकलनाची प्रक्रिया पूर्ण केली. रक्तदानानंतर दात्यांना प्रमाणपत्र व अल्पोपहार देण्यात आला.
या यशस्वी शिबिरासाठी आयोजक दरार मंडळ, व मित्र परीवार मुल रक्तदाते यांचे विशेष कौतुक करण्यात आले. “रक्तदान हेच जीवनदान” हा संदेश या उपक्रमातून प्रभावीपणे जनतेपर्यंत पोहोचला. सदर रक्तदान शिबिर व वाढदिवसाच्या दिवसभर चाललेल्या शुभेछ्याचे सर्वत्र कौतुक करण्यात येत आहे.





