समर्पित रुग्णसेवेसाठी होमिओपॅथी तज्ञ डॉ चव्हाण दांपत्याचा झाला गौरव

0
216

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: अनेक वर्षापासून होमिओपॅथी विश्‍वात रुग्णसेवा करून वैद्यकीय सेवेत सामाजिक दायित्वचा वसा जोपासणारे महानगरातील होमिओपॅथी तज्ञ डॉ. संदीप चव्हाण तथा डॉ.सौ योगिता चव्हाण या दाम्पत्याचा अवॉर्ड प्रदान करून गौरव करण्यात आला.शनिवारी जठारपेठ परिसरातील शगुन सभागृहात संपन्न “द अचिव्हर्स 2022” हा कर्तृत्ववान सेवाभावी व्यक्तींचा गौरव सोहळा संपन्न झाला.कोठारी कंट्रक्शनच्या सौजन्याने संपन्न झालेल्या या गौरव सोहळ्यात डॉ. संदीप चव्हाण यांचा सपत्नीक गौरव करण्यात येऊन त्यांना एक्सलन्स इन होमिओपॅथी अँड अवरेनेस या श्रेणीत “अचिव्हर्स अवॉर्ड 2022” ने सन्मानित करण्यात आले.या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून माजी पालकमंत्री डॉ.रणजीत पाटील,चित्रपट अभिनेते गिरीश परदेशी,जेष्ठ ऑर्थोपेडीक तज्ञ डॉ. अभय पाटील,निवासी उपजिल्हाधिकारी प्रा.संजय खडसे,कोठारी कंट्रक्शनचे संचालक पंकज कोठारी, रेडक्रॉसचे सचिव प्रभूजीतसिंह बचेर,डॉ.किशोर मालोकार आदी मान्यवर उपस्थित होते.यावेळी डॉ. चव्हाण दांपत्याच्या सामाजिक व वैद्यकीय सेवाभावी कार्याची कार्याचा परिचय करून देण्यात आला.करोना संकट काळात तीन लाखांच्यावर नागरिकांना होमिओपॅथीच्या इमुनिटीची औषधे वितरित करून त्यांनी आपले सामाजिक दायित्व पार पाडले.त्यांनी अनेक गावांना दत्तक घेऊन अनेक वैद्यकीय शिबिरे आयोजित केलीत.पश्चिम विदर्भात होमिओपॅथीच्या क्षेत्रात त्यांनी मोलाची कामगिरी केली आहे.त्यांच्या कार्याबद्दल त्यांना जिल्हा प्रशासनाकडून ही वेळोवेळी सन्मानित करण्यात आले असल्याचे सांगण्यात आले.
यावेळी खचाखच भरलेल्या श्रोत्यांच्या उपस्थितीत टाळ्यांच्या गजरात डॉ चव्हाण दाम्पत्याचे स्वागत करण्यात आले.दीप प्रज्वलन व सरस्वती पूजन व स्वरा अकादमीच्या कल्याणीच्या स्वागत गीताने या रंगारंग सोहळ्याचा प्रारंभ करण्यात आला.मान्यवरांचे स्वागत क्षेत्रीय बिझनेस हेड विवेक पवार,गिरीश सर यांनी केले.तर संचालन अथर्व आदींनी केले.पंकज कोठारी यांनी यावेळी आपले मनोगत व्यक्त केले.या कार्यक्रमात व्यापार,उद्योग, कला, क्रीडा,समाजसेवा,सांस्कृतिक व माध्यम क्षेत्रातील मान्यवर मंडळी उपस्थित होती.

Previous articleनाविण्यपूर्ण शैक्षणिक प्रशासनाच्या उत्तम पद्धती अंमलात आणल्याबद्दल, शिक्षणाधिकारी डॉ. सुचिता आनंद पाटेकर यांना राष्ट्रीय स्तरावरील पुरस्कार घोषित
Next articleअकोला: शिवजयंती सप्ताहाचा शिवाजी महाराज पार्क येथे थाटात प्रारंभ

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here