जन अभियान फाउंडेशन ने केली निराधार बालकांची तपासणी

0
203

वऱ्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला -गत अनेक वर्षापापासून सामाजिक दायित्व जोपासुन समाजाची सेवा करणाऱ्या जनअभियान फाउंडेशनच्या वतीने महानगरातील विविध बालगृहातील बालकांचे दंत, रक्तगट व हिमोग्लोबीन तपासणी शिबिर संपन्न झाले.रविवारी मलकापूर परिसरातील सूर्योदय बालगृहात जनअभियान फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांच्या अध्यक्षतेत संपन्न या शिबिराच्या उद्घाटक म्हणून जिल्हा शल्य चिकित्सक डॉ वंदना पटोकार उपस्थित होत्या.तर प्रमुख पाहुणे म्हणून जिल्हा स्त्री रुग्णालयाच्या अधीक्षिका डॉ. आरती कूलवाल,खदान पोलिस ठाण्याचे पोलीस निरीक्षक श्रीरंग सणस,महिला बालकल्याणचे सुनील लांडूळकर,जनअभियान फाऊंडेशनच्या संचालिका पूजाताई काळे,देवीलाल तायडे,राजीव ईटोले,दिनेश लोहकार,सूर्योदय बालगृहाच्या अध्यक्षा प्रतिभाताई देशमुख डॉ.तुषार रोठे,डॉ.निकिता धांडे,बालगृहाचे प्रकल्प समन्वयक शिवराज पाटील आदी मान्यवर उपस्थित होते.शिबिराचा प्रारंभ भारत माता पूजन,दीप प्रज्वलन व स्वागताने झाला.यावेळी दंतचिकित्सा, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी करणाऱ्या डॉक्टरांचा जन अभियानच्या वतीने शाल व श्रीफळ देऊन सन्मान करण्यात आला. शिबिर उद्घाटक डॉ वंदना पटोकार यांनी जनअभियान फाउंडेशनच्या सेवा कार्याचे कौतुक करीत आपल्या शुभेच्छा बहाल केल्यात.आपल्या अध्यक्षीय मनोगतात फाऊंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अविनाश उर्फ भैय्यासाहेब देशमुख यांनी बालगृह, बालिकाश्रम मधील बालकांच्या सेवेसाठी जन अभियान फाउंडेशन नेहमीच तत्पर राहण्याची ग्वाही दिली.जन अभियान फाउंडेशनच्या वतीने नुकतीच सर्व बालगृहातील बालकांची सहल चिखलदरा येथे नेण्यात आली होती.त्या सहलीच्या आठवणी मधील फोटो सर्व बालगृहाच्या अधीक्षकांना मान्यवरांच्या हस्ते देण्यात आला.यावेळी शासकीय बालगृह,गायत्री बालकाश्रम, आनंद आश्रम,सूर्योदय बालगृह,उत्कर्ष शिशूगृहा मधील बालकांची दंत, रक्तगट व हिमोग्लोबिन तपासणी डॉ.तुषार रोठे,डॉ.निकिता धांडे,डॉ. राजेश कळंब,डॉ. मनिष पद्मने यांनी केली.या शिबिरास
डायग्नोस्टिक सेंटर,रुग्णसेवा मल्टीपर्पज फाउंडेशनचे सहकार्य लाभले.संचालन सुरज घोगरे यांनी तर प्रास्ताविक पूजाताई काळे यांनी तर आभार निकिता माळी यांनी मानलेत.यावेळी महादेव बोराडे, पवन शेंडोकार,राजेश खंडाळकर,स्वप्नील धुमाळे, प्रशांत देशमुख,रेखाताई बावणे,हर्षा भाबड,विवेक राउत, सुरज घोगरे,पल्लवी पाटील,मंगेश वानखडे,शंतनू इटोले,सागर गोळे,प्रवीण इंगळे,माया इरतकर,प्रांजली जयस्वाल,प्रवीण काळे समवेत फाऊंडेशन व विविध बालगृहातातील अधिकारी व कर्मचारी उपस्थित होते.

Previous articleअकोला: शिवजयंती सप्ताहाचा शिवाजी महाराज पार्क येथे थाटात प्रारंभ
Next articleमोदी देशात सर्वात मोठे नौटंकीबाज- काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा आरोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here