खा. संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरात कचरापेटीचे वितरण

0
166

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला- माजी केंद्रीय मंत्री,खा. संजयभाऊ धोत्रे यांचा वाढदिवस महानगरात मोठ्या उत्साहात साजरा करण्यात आला. भाजप युवा मोर्चा उत्तर मंडळच्या वतीने आ. गोवर्धन शर्मा,जिल्हाध्यक्ष व आ. रणधीर भाऊ सावरकर,आ. वसंत खंडेलवाल,महानगर अध्यक्ष विजय अग्रवाल, महापौर अर्चना मसने,उपमहापौर व उत्तर मंडळ अध्यक्ष राजेंद्र गीरी,अनुपदादा धोत्रे आदींच्या मार्गदर्शनात व महानगर युवा मोर्चा अध्यक्ष उमेश गुजर,युवा मोर्चा उत्तर मंडळचे उपाध्यक्ष नितीन नरेश राऊत यांनी साकार केलेल्या उपक्रमात स्वच्छ भारत अभियानचा आदर्श व दुष्टीकोन समोर ठेवून अकोट फैल परिसरातील सर्व शासकिय कार्यालये व व्यावसायिकांना मोफत कचरापेटी वितरित करण्यात आल्यात.या वितरण सोहळ्याचा प्रारंभ नितिन बिछायत केंद्र,हनुमान चौक, लाडीस फैल येथून करण्यात आला.मान्यवरांनी या उपक्रमाचे कौतुक करीत खा धोत्रे यांच्या दिर्घायुष्याची कामना केली.या माजी महानगर अध्यक्ष किशोर मांगटे पाटिल, डॉ युवराज देशमुखझ राजेश उदयापुरे, नगरसेविका सौ अनिता चौधरी, सौ आरती घोगलीया,राजेश रेड्डी, रमेश करीहार, कल्लु अहिरवाल, कैलाश रणपिसे,घनशाम शिन्दे,सुरेश जाधव,राजेश चौधरी,जाकिर भाई, अशपाकभाई,सौ रंजना पवार,सौ शुष्मा शुक्ला, रुपेश यादव, टोनी जयराज, बल्लु चौधरी, प्रमोद लोडगे, राहुल विधाते ,राजु पर्वते, बबलु ओव्हाळ,रूपेश राऊत, अमित यादव, राहुल सोनार, मयुर बालगुडे, अमर उज्जैनवाल, राज उज्जैनवाल,शेख सोहेल, राजकुमार गायकवाड,राजु पाळसुकर,सुरज मद्दलवार ,लोकेश शिंदे,गौतम सरकटेझ गणेश यादव,जतनसिंग विक्की, आकाश पवार, लखन इंगळे समवेत शेकडो नागरिक उपस्थित होते.

Previous articleखा. संजयभाऊ धोत्रे यांच्या 63 व्या वाढदिवसानिमित्त सेवाभाव समर्पण दिन साजरा
Next articleरविवारी वीरस्त्री स्व.लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरिय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here