महानगरातील ऑटो चालकांना मोफत पीयूसी प्रमाणपत्राचे वितरण

0
165

अकोला महानगर काँग्रेस परिवहन विभागाचा उपक्रम
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला : प्रदेश काँग्रेस कमिटी परिवहन विभाग अंतर्गत अकोला महानगर काँग्रेस परिवहन विभागाच्या वतीने महानगरातील ऑटोचालकांना मोफत पीयूसी प्रमाणपत्र वितरण शिबिर रविवारी मोठ्या उत्साहात संपन्न झाले.
स्थानीय अकोला पीयूसी सेंटर आरटीओ ऑफिस परिसरात आयोजित या वितरण शिबिराचे उद्घाटक काँग्रेस नेते अविनाश भाऊ देशमुख होते. तर प्रमुख पाहुणे म्हणून महिला कॉंग्रेस शहराध्यक्ष पुष्पाताई देशमुख,माजी विभागीय अध्यक्ष केंद्र व राज्य योजना सनियंत्रण समिती नंदाताई मानकर,प्रदेश युवक काँग्रेसचे सचिव सागर कावरे, प्रवीण काळे, कार्यक्रमाचे मार्गदर्शक देवीलाल तायडे आदी उपस्थित होते.काँग्रेस परिवहन विभाग अकोलाचे महानगराध्यक्ष
नंदरत्न खंडारे यांनी साकार केलेल्या या कार्यक्रमाचे उद्घाटक अविनाश देशमुख व प्रमुख पाहुण्यांच्या हस्ते ऑटो चालकांना पुष्पगुच्छ व मोफत पीयुसी प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.या शिबिरात शेकडो ऑटो चालकांनी उपस्थित राहून उस्फूर्त प्रतिसाद दिला. कोरोना महामारी मुळे परिस्थिती नाजूक असलेल्या शेकडो ऑटो चालकांना या मोफत पियुसी प्रमाण पत्राचा फायदा झाला आहे.काँग्रेस परिवहन विभाग अकोला द्वारा असा आगळावेगळा सामाजिक उपक्रम राबविण्यात आल्याने ऑटो चालकांनी आयोजकांचे आभार मानले.हे शिबिर यशस्वी करण्याकरिता विनोद नालट,इलियासखान लोधी, श्रीकृष्ण डोंगरे, संजय इंगळे,जाफर अली,रमेश वानखडे,सुधिर चौधरी,अमित शिरसाट,कमलरत्न खंडारे,चंद्रमणी इंगळे,राहत खान यांनी अथक परिश्रम घेतले.

Previous articleराज्यस्तरिय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेचा आज शानदार समारोप
Next articleसमाजात गोवंश संवर्धनाच्या प्रशिक्षणची गरज

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here