वर्हाड दूत न्यूज अकोला
अकोला जिल्हा परिषदेचे अध्यक्ष प्रतिभाताई भोजने व माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी आज बुधवारी अकोला महानगरातील काही शाळांना भेटी दिल्या. यामध्ये अनेक शाळा उघडल्याच नसल्याचे धक्कादायक वास्तव समोर आले. यामुळे शिक्षकांचे बिंग फुटले आहे.
अकोला महानगरातील हरिहरपेठ भागातील शाळेला विद्यमान जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने व
माजी जिल्हा परिषद अध्यक्षा पुष्पाताई इंगळे यांनी भेट दिली. यावेळी त्यांनी मुख्याध्यापक व कर्मचाऱ्यांना पाच वाजता बोलावून शाळेची पाहणी केली. तेव्हा मुख्याध्यापक कार्यालय, वर्ग खोल्या कित्येक दिवसापासून उघडल्याच नसल्याचे दिसून आले. शिवाय शाळा परिसरात घाणीचे साम्राज्य आढळून आले. काही खोल्यामधील साहित्य चोरीला गेल्याचेही दिसून आले. तेव्हा अध्यक्षांनी तत्काळ शिक्षणाधिकारी वैशाली ठग यांना शहरातील हरिहरपेठ जिल्हा परिषद माध्यमिक शाळेत घेतले बोलावून घेवून गैरप्रकाराबाबत जाब विचारला. व शहरातील जिल्हा परिषद माध्यमिक शाळांचा रामभरोसे कारभाराबाबत कानउघाडणी केली. संबधित शाळेचे मुख्याध्यापक व शिक्षकांना कारणेदाखवा नोटीस बजावून शहरातील इतर सर्व शाळा तत्काळ सुरु करून ज्ञानदानाचे कार्य पार पाडावे अशा सुचनाही जिल्हा परिषद अध्यक्षा प्रतिभाताई भोजने यांनी दिले आहेत.





