जागतिक महिला दिनानिमित्त मेकअप आर्टिस्ट सौ. मिनल श्रीकांत पाचकवडे यांचा एक्सलंट अवार्ड ने गौरव

0
235

अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांच्या हस्ते पुरस्कार वितरण

अकोला, ता. ८ : जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवार दि. ८ रोजी अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क मध्ये आयोजित वन डे ब्रायडल मेकअप & हेअर स्टाईल कॉम्पिटिशन मध्ये अकोला येथील निशा मेकओव्हर च्या संचालिका सुप्रसिद्ध मेकअप आर्टिस्ट सौ. मिनल श्रीकांत पाचकवडे यांचा अमरावती च्या खासदार नवनीत राणा, मेकअप आर्टिस्ट संगिता आहुजा, इंटरनॅशनल हेअर स्टाईलिस्ट (दिल्ली ) विनोद यांच्या हस्ते बेस्ट मेकअप आर्टिस्ट एक्सलंट अवार्ड २०२२ देऊन सन्मानित करण्यात आले.

आजच्या आधुनिक युगात सुंदर दिसण्याचा मोह प्रत्येकालाच असतो. लग्न सोहळा असो कि सण- उत्सव युवती, महिला छान सजुन आपले सौंदर्य खुलवण्यासाठी वेगवेगळे प्रयत्न करीत असतात. आणि त्यामुळेच मेकअप क्षेत्रात ही नवनवीन बदल , नाविन्यपूर्णता येत असुन यासाठी एक वेगळे व्यासपीठ उपलब्ध करून देतानाच ग्लॅम दिवा ब्युटी अकॅडमी, जसराज सेल्स, सर्वज्ञ कॉस्मेटिक यांच्या संयुक्त विद्यमाने जागतिक महिला दिनानिमित्त मंगळवारी अमरावती येथील हॉटेल प्राईम पार्क येथे वन डे ब्रायडल मेकअप & हेअर स्टाईल कॉम्पिटिशन घेण्यात आली. या स्पर्धेत संपुर्ण विदर्भातील विविध जिल्ह्यातील ब्युटी पार्लर घ्या मेकअप आर्टिस्ट सहभागी झाल्या होत्या. या स्पर्धेत अकोला येथील निशा मेकओव्हर च्या संचालिका सौ. मिनल श्रीकांत पाचकवडे यांनी उत्कृष्ट मेकअप सादरीकरण केल्याबद्दल त्यांचा खासदार नवनीत राणा, मेकअप आर्टिस्ट संगिता आहुजा, इंटरनॅशनल हेअर स्टाईलिस्ट (दिल्ली ) विनोद यांच्या हस्ते एक्सलंट अवार्ड ट्राॅफी, सन्मानपत्र, पुष्पगुच्छ देऊन सन्मानित करण्यात आले. यावेळी बोलताना खासदार नवनीत राणा म्हणाल्या की, आजच्या स्पर्धेच्या युगात महिलांनी नवनवीन क्षेत्राचे ज्ञान संपादन करुन स्वतः सह आपले कुटुंब, शहर आणि राज्याचे नाव उज्वल करीत प्रगतीच्या दिशेने वाटचाल करावी. मेकअप इंडस्ट्री मध्ये ही चांगले करीअर असुन युवती, महिलांनी या क्षेत्रातील ज्ञान मिळवुन यशाची शिखरे पादाक्रांत करावीत. या कार्यक्रमात मेकअप आर्टिस्ट संगिता आहुजा, इंटरनॅशनल हेअर स्टाईलिस्ट (दिल्ली ) विनोद यांनी उपस्थित ब्युटिशीयनला मेकअप आणि हेयर स्टाईल मध्ये आलेल्या नवनवीन बदल, नाविन्यपूर्णतेवर सखोल मार्गदर्शन केले. या कार्यक्रमात अकोला, अमरावती,वाशिम, बुलडाणा, यवतमाळ सह विदर्भातील ब्युटिशीयन मोठ्या संख्येने उपस्थित होत्या.

Previous articleजिल्हा परिषद योजना राबवण्यात अपयशी सात कोटींचा निधी पडून, महाविकास आघाडीचे धरणे
Next articleआमदार डॉ. संजय कुटे यांच्या वाढदिवसानिमित्त प्रकाशित ‘भगीरथ’ विशेषांकाचे विमोचन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here