व-हाड दूत न्युज नेटवर्क
अकोला: जिल्हा पोलीस अधीक्षक जी. श्रीधर यांच्या विशेष पथकाकडून 2 वर्षाकरिता तडीपार असलेल्या आरोपीस अटक आज दि. 21 जुलेरोजी अटक करण्यात आली.
विशेष पोलिस पथक गुन्हेगार शोध पेट्रोलिंग करीत असतांना गुप्त माहिती मिळाली कि तडीपार असलेला आकाश उर्फ सोनू श्याम खडसे वय 27 रा. कैलास टेकडी अकोला हा स्टुडिओ 3 डी चे समोर सिंधी कॅम्प खदान येथे उभा आहे. अश्या खात्रीलायक बातमी वर सदर ठिकाणी जाऊन पाहणी करून रेड केली असता तेथे सदर आरोपी मिळून आला.त्याला त्याच्या तडीपार स्थगिती बाबत विचारले असता त्याने नसल्याचे सांगितले.त्याचे हे कृत्य महा. पो. का.कलम 142 प्रमाणे होत असल्याने त्याचे विरुद्ध पो. स्टेशन खदान अकोला येथे गुन्हा नोंदविण्यात आला आहे. सदरची कारवाई पोलिस अधीक्षक जी.श्रीधर, अपर पोलिस अधीक्षक मोनिका राऊत मॅडम यांच्या मार्गदर्शनाखाली
पोलिस निरिक्षक विलास पाटील आणि विशेष पथकाने केली.





