सरपंचपती एसीबीच्या जाळ्यात, ग्रामसेवकावरही गुन्हा दाखल

0
120

शाळा नुतनीकरण बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी
जऊळका येथील ग्रामसेवक व सरपंच पतीने मागितली

व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला: जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाचे बांधकामाचे बिल अदा करण्यासाठी अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत अकोट तालुक्यातील ग्राम जऊळका येथील ग्रामसेवक व सरपंच पतीने शासकीय कंत्राटदारास ४६ हजार रुपयांची लाच मागितली. यापैकी ४० हजार रुपये लाच घेतांना सरपंचपतीस लाच लुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने रंगेहाथ पकडले. ही कारवाई २ ऑगस्टरोजी संध्याकाळी करण्यात आली. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने रात्री उशिरा ग्रामसेवकासह सरपंच पतीविरुद्ध गुन्हा दाखल केला आहे.
याबाबत सविस्तर असे की, अकोला जिल्हा परिषदेअंतर्गत येणा-या अकोट तालुक्यातील ग्राम जउळखेड येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेच्या नुतनीकरणाचे बांधकाम शासकीय कंत्राटदाराने पूर्ण केले. त्याचे बिल ४ लाख ६६ हजार १३२ रुपये अदा करावयाचे होते. यासाठी सरपंचपती आशिष दत्तात्रय निपाणे वय ३५ वर्ष रा. जउळका ता. अकोट यांचेसह ग्रामसेवक उत्तम देविदास तेलगोटे वय ५२ वर्ष रा. खानापूर वेस ता. अकोट या दोघांनी दहा टक्के प्रमाणे ४६ हजार रुपये लाच मागितली. त्यातील ४० हजार रुपये लाच घेतांना सरपंच पती आशीष निपाणे यास अकोट तालुक्यातील करोळी फाट्यावरील इस्सार पेट्रोलपंपावर अकोला लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने २ ऑगस्टरोजी संध्याकाळी रंगेहाथ पकडले. याप्रकरणी लाच लुचपत प्रतिबंधक विभागाने सरपंचपती व ग्रामसेवकाविरुद्ध २ ऑगस्टरोजी रात्री उशिरा गुन्हा दाखल केला असून सरपंचपतीस अटक केली आहे तर ग्रामसेवक फरार असल्याने त्याचा शोध सुरु आहे. एसीबीचे पोलिस निरिक्षक नरेंद्र खैरनार व सहका-यांकडून आरोपी ग्रामसेवकाचा शोध सुरु आहे. ही कारवाई अकोला लाच लुचपत प्रतिबंधक विभागाचे पोलिस उपअधिक्षक यु.व्ही. नामवाडे यांच्या मार्गदर्शनात करण्यात आली.

Previous articleऑटोचालकाचा प्रामाणिकपणा, दिड लाखाचा मोबाईल दिला परत
Next articleगर्लफ्रेंडने लॉजवर येण्यास दिला नकार

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here