Home मूल भूमिपुत्र ब्रिगेडच्या मागणीची मनपाने घेतली तात्काळ दखल

- चंद्रपूर :- सविस्तर बातमी याप्रमाणे आहे की नगीना बाग प्रभागातील मिशन कंपाऊंडच्या आतील जागेत आणि सेंट मायकल स्कूल पासूनच्या वरील भागातून पावसाचे दुर्गंधयुक्त पाणी जमा होऊन मिशन कंपाऊंडला लागून असलेल्या महाडोळे लेआउट मधील खोलगट भागात आणि जवळपास 10 ते 15 घरांमध्ये जाते आणि ही पाण्याची समस्या गेल्या 30 ते 40 वर्षापासून असल्यामुळे येथील नागरिक त्रस्त झाले आहेत यावर त्वरित उपाययोजना करण्यात यावी याकरिता भूमिपुत्र ब्रिगेड महिला विंग्स द्वारे महानगरपालिका आयुक्त ,चंद्रपूर यांना निवेदन देण्यात आले आणि वरील सर्व विषय समजून सांगण्यात आला. त्यानंतर दुसऱ्याच दिवशी भूमिपुत्र ब्रिगेडच्या मागणीची तात्काळ दखल घेत महानगरपालिके च्या अधिकाऱ्यांनी भूमिपुत्र ब्रिगेडच्या पदाधिकाऱ्यां सोबत पाणी ग्रस्त भागाची पाहणी केली आणि यावर त्वरित पाईपलाईन टाकून पाण्याचा मार्ग बदलवून पाण्याची समस्या सोडवून देऊ अशी ग्वाही दिली. याकरिता भूमिपुत्र ब्रिगेड महिला अध्यक्षा मा. छायाताई सोनुले सोबतच वनिता गुरनूले,पुष्पा मोहूर्ले,पुनम मोहूर्ले ,शारदा गुरनूले, विजया गुरनूले ,रेश्मा मून, मायाताई गुरनूले ,भारती गुरणुले, नंदा गवळी यांचे सहकार्य लाभले.
© All Rights Reserved