Mul:- महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री तथा शिवसेना पक्षाचे मुख्य नेते मा.ना.एकनाथ शिंदे यांचा आज 61 वा वाढदिवस त्या निमित्याने शिवसेना तालुका मुलच्या वतीने मानव सेवा हीच ईश्वर सेवा हे ब्रीद ठेऊन ग्रामीण रुग्णालय मुल येथे रुग्णांना फळ वाटप करण्यात आले तसेच रुग्णालयातील भरती रुग्णांकडून आरोग्य सेवा सुविधा बाबतची आस्थेने विचारपूस करण्यात आली व रुग्णांना आरोग्य सेवा देताना आरोग्य अधिकारी आणि कर्मचारी यांच्याकडून दुर्लक्ष होणार नाही याबाबत सूचना देण्यात आल्या.याप्रसंगी शिवसेना शहर प्रमुख विशाल नागुलवार, शिवसेना महिला आघाडी तालुकाप्रमुख भारती राखडे, शिवसेना उपतालुकाप्रमुख संतोष एप्पलवार, शिवसेना महिला आघाडी शहर प्रमुख अर्चना सहारे , युवा सेना शहर प्रमुख सतीश वैरागडवार, उपतालुका प्रमुख वंदना टिकले,महिला आघाडी उपशहर प्रमुख उर्मिला कोहळे सामाजिक कार्यकर्ता हर्ष गांडलेवार तसेच शिवसेना महिला व पुरुष कार्यकर्ते शिवसेना पदाधिकारी उपस्थित होते.





