मूल:- ( कुमुदिनी भोयर ) महाराष्ट्र पोलीस सेवेत परिविक्षाधीन अधिकारी म्हणून प्रमोद चौगुले यांनी मूल पोलीस ठाण्याच्या प्रशासनाची जबाबदारी स्वीकारून पंधरवडा पूर्ण केला आहे. या १५ दिवसांच्या कालावधीत अवैध आणि बेकायदेशीर धंद्यांविरोधात कठोर कारवाई हाती घेऊन मूल तालुक्यात शांतता आणि सुव्यवस्थेसाठी प्रयत्न केल्यामुळे त्यांची सर्वत्र चर्चा सुरू आहे. या पार्श्वभूमीवर शिवसेना मुल तालुका च्या वतीने प्रमोद चौगुले सर यांची भेट घेऊन त्यांचे अभिनंदन करण्यात आले. तसेच तालुक्यातील कायदा-
सुव्यवस्थेबाबत त्यांच्याशी संवाद साधण्यात आला.
मी परिविक्षाधीन अधिकारी म्हणून जबाबदारी पार पाडत असताना तालुक्यात अवैध व बेकायदेशीर धंद्यांविरोधी अभियान सातत्याने सुरू ठेवणार आहे. जनतेच्या हिताचे रक्षण करण्यासाठी माझे प्रयत्न अखंड सुरू राहतील, अशी ग्वाही प्रमोद चौगुले सर यांनी यावेळी दिली. या भेटीला शिवसेना महिला आघाडी जिल्हाप्रमुख भारती राखडे शिवसेनेचे शहरप्रमुख विशाल नागुलवार , उपतालुकाप्रमुख संतोष एप्पलवार , युवासेनेचे शहराप्रमुख सतीश वैरागरवार, शिवसेनेचे पदाधिकारी विनीत वाकडे , सक्षम वाकडे, शांतनु नलुरवार, तालुकाप्रमुख शिवसेनाआदी उपस्थित होते.





