वाघाच्या हल्ल्यात युवा शेतकऱ्याचा मृत्यू – महिन्यात तिसरी घटना असल्याने परिसरात संतापाचे वातावरण

0
253

मुल – तालुक्यातील चितेगाव येथे आज वाघाने हल्ला केल्याने शेषराव नागोसे वय 35 या युवा शेतकऱ्याचा बळी गेला असून या परिसरात महिन्यात घडलेली तिसरी घटना असून परिसरात संतापाचे वातावरण आहे.

चितेगांव रहिवासी शेषराव नागोसे हा आपल्या वडिलासोबत शेतात पिकाला पाणी देत असतांना वाघाने हल्ला केला व परपटत नेत शरीरापासून डोके वेगळा करीत ठार केले. या परिसरात महिन्याभरात निलेश कोरेवार, मला येगावार या दोन मेंढपाळाचा मृत्यू झाला होता. त्यानंतर वनविभागाने वाघास जेरबंद करण्यासाठी प्रयत्न केले मात्र हुलकवणी दिल्याने फिंजऱ्यात आलाच नाही. वाघाने हल्ला सावली वनपरीक्षेत्रात केलेला असून मृतदेह चिचपल्ली वनपरीक्षेत्रात आढललेला आहे. आज तिसरी घटना घडल्याने वनविभागाचे विरोधात परिसरात संताप व्यक्त केल्या जात आहे.

Previous articleमूल येथिल युवतीला फेसबुकनी पोचविले आसामात….? फेसबुक इंस्टाग्राम पासून सावधान…
Next articleसफाई कामगारांचे वारसदार लाड पागे समितीच्या लाभापासून वंचित ; मुख्याधिकाऱ्याचे दुर्लक्ष ; पत्रकार परिषदेत दिली माहिती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here