विविध उपक्रमाने भिम जयंती साजरी भीम जयंती उत्सव समितीचा उपक्रम

0
348

मूल (प्रतिनिधी): भीम जयंती उत्सव समितीच्या वतीने दरवर्षीप्रमाणे यंदाही 14 एप्रिल रोजी भीम जयंतीचा उत्सव मोठ्या थाटात संपन्न झाला, यावेळी विविध उपक्रम राबविण्यात आले .मुल येथील बस स्थानकावर सकाळी 8 वाजता दरम्यान छत्रपती शिवाजी महाराज, क्रांतीसुर्य महात्मा ज्योतिबा फुले आणि बोधिसत्व, परमपूज्य, भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमा भेट देऊन, बस स्थानकाच्या दर्शनी भागावर लावण्यात आले. यावेळी वाहतूक नियंत्रण वाडकर उपस्थित होते.

मुलांना वाचण्याची आणि लिहिण्याची सवय लागावी यासाठी उत्सव समितीच्या वतीने मुल येथील गांधी चौकामधील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेतील विद्यार्थ्यांना नोटबुक आणि चॉकलेटचे वाटप करण्यात आले यावेळी शाळेतील मुख्याध्यापक महेश रामटेके सहायक शिक्षक रामटेके आणि शिक्षकेतर कर्मचारी आणि उत्सव समितीचे पदाधिकारी उपस्थित होते यावेळी शाळेतील जवळजवळ शंभर विद्यार्थ्यांना या नोटबुकचे वितरण करण्यात आले, मुल कृषी उत्पन्न बाजार समितीच्या कार्यालयाला डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची प्रतिमा भेट देण्यात आली. यावेळी बाजार समितीचे सभापती राकेश रत्नावार, उपसभापती राजेंद्र कन्नमवार संचालक किशोर घडसे, तुलाराम घोगरे उपस्थित होते.

मुल येथील उपजिल्हा रुग्णालयात उत्सव समितीच्या वतीने फळवाटप करण्यात आले यावेळी उपजिल्हा रुग्णालयाचे प्रभारी वैद्यकीय अधीक्षक डॉ. देवेंद्र लाडे वैद्यकीय अधिकारी डॉ. तिरथ उराडे, डॉ. वसीम शेख आणि कर्मचारी वृंद उपस्थित होते.

यावेळी भीम जयंती उत्सव समितीचे काजू खोब्रागडे, शाम उराडे, अतुल गोवर्धन, सुरेश फुलझेले, कुमार दुधे, बालू दुधे, संतोष घुटके उपस्थित होते.

Previous articleश्री साई जुना सोमनाथ हनुमान मंदिर सेवा समिती, मूल व श्री साई मित्र परिवार मूल चे आग्रहाचे निमंत्रण
Next articleजयंती निमित्त शैक्षणिक साहित्य वाटप; पंचशील नगर येथिल युवक युवतीच्या पुढाकार 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here