मुल. ओबीसी वा बहुजनांचे नेते, अ.भा.महात्मा फुले समता परिषदेचे संस्थापक अध्यक्ष, राष्ट्रवादी काँग्रेस (अ. प.) गटाचे ज्येष्ठ नेते मान. छगनराव भुजबळ यांची राज्याच्या मंत्रिमंडळात कॅबिनेट मंत्रीपदी निवड झाल्याबद्दल मूल शहरातील गांधी चौकात अ.भा. महात्मा फुले समता परिषदेचे जिल्हाध्यक्ष प्रा. विजय लोनबले यांच्या नेतृत्वात फटाक्यांची आतिषबाजी करून पेढे वाटून आनंदोत्सव साजरा करण्यात आला. याप्रसंगी समता परिषदेचे मार्गदर्शक, माजी जिल्हा परिषद सदस्य प्रा. रामभाऊ महाडोळे यांनी भुजबळ साहेबांच्या सामाजिक व राजकीय वाटचालीवर प्रभाव टाकला. निडर स्वभाव, लढवय्या बाणा, दूरदर्शी नजर, झंजावाती काम ,प्रगल्भ व्यक्तिमत्व असे भुजबळ साहेबांचे व्यक्तिमत्त्वाचे पैलू आहेत. मंत्रिमंडळात समावेशामुळे सर्वांना आनंद होत आहे असे मत मांडले. प्रा. विजय लोनबले यांनी भुजबळ साहेब ओबीसी व बहुजनांच्या न्याय मागण्या सोडवण्यासाठी सातत्याने झटत असतात. पुन्हा मंत्रिमंडळात थाटात एन्ट्री घेऊन सर्वसामान्यांचे प्रश्न मार्गी लावण्यासाठी साहेबांची मंत्रिमंडळात गरज आहे असे प्रतिपादन केले. याप्रसंगी समता परिषदेच्या महिला जिल्हा कार्याध्यक्षा सौ. शशिकला गावतुरे, समता परिषदेचे ज्येष्ठ कार्यकर्ते से.नि. प्राचार्य गंगाधर कुनघाडकर, प्रा.डॉ.केवल कराडे, , श्री नामदेव गावतुरे,सौ. सीमाताई लोनबले ,समता परिषदेचे शहराध्यक्ष श्री. राकेश मोहुलें, तालुका सचिव ओमदेव मोहुलें, जिल्हा सहसचिव श्री. संजय चौधरी, प्रा. दिलीप वारजूरकर, श्री. सतीश राजुरवार, श्री. बालगोविंद आदे, चिमढा उपसरपंच श्री.योगेश लेनगुरे, माजी उपसरपंच श्री. भारत वाळके, समता परिषदेचे श्री. दुशांत महाडोळे, श्री .प्रदीप वाढई, श्री. किशोर राऊत, श्री. दीपक महाडोळे, श्री. धनराज मोहुलें, श्री. वासुदेव नागोसे, श्री. दिलीप गेडाम, श्री. प्रवीण रामटेके श्री. सचिन मोहुलें, श्री.गुरुदेव दासरवार, पंकज लोनबले, सुरेश निकुरे, रामकृष्ण कावळे, एकनाथ मांदांळे, किशोर लोनबले, सम्यक ताकसांडे, सचिन लोनबले तसेच शेकडो कार्यकर्त्यांच्या उपस्थितीत जल्लोष करण्यात आला.