मुल येथे पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर त्रिशताब्दी जयंती निमित्त महिला संमेलन व सिंदूर रॅली  भव्य सिंदूर रॅली चे आयोजन महिला मेळाव्यात वीरमाता व विरपत्नींचा होणार कृतज्ञतापर सत्कार 

0
87

मूल:- जिथे धर्म आहे तिथे न्याय आहे आणि तोच माझा मार्ग आहे अशे म्हणत सण 1725 ते 1795 च्या काळात अनेक मंदिरांचा जीर्णोद्धार करीत धर्मरक्षण करणाऱ्या पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांच्या त्रिशताब्दी जयंती निमित्ताने मुल येथे भारतीय जनता पक्षाच्या वतीने महिला संमेलन व भव्य सिंदूर रॅली चे आयोजन करण्यात आलेले आहे. येणाऱ्या 30 मे 2025 ला दुपारी 1 वाजता मुल येथील कर्मवीर मा सा कन्नमवार सभागृहात हा सोहळा होणार आहे, जिल्ह्याचे माजी पालकमंत्री, महाराष्ट्राचे लोकनेते आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांची विशेष मार्गदर्शन या सोहळ्याला राहील , भारतीय जनता पक्षाचे ग्रामीण जिल्हाध्यक्ष श्री हरीशभय्या शर्मा यांच्या अध्यक्षतेखाली हा सोहळा संपन्न होणार आहे, या मेळाव्यात देशसेवेसाठी शहीद झालेल्या विरपत्नी व विरमातांचा कृतज्ञतापर सत्कार करण्यात येणार आहे,

मेळाव्या पूर्वी नवभारत विद्यालय ते कन्नमवार सभागृह पर्यंत देशसेवेसाठी लढलेल्या जवानांच्या शूरतेसाठी भव्य अश्या सिंदूर रॅली चे आयोजन आहे , सदर रॅली चे नेतृत्व जिल्हा परिषदेच्या माजी अध्यक्षा व चंद्रपूर जिल्हा भाजप महामंत्री श्रीमती संध्याताई गुरनुले, भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या महाराष्ट्र प्रदेश सरचिटणीस कु अलकांताई आत्राम, भाजप महिला जिल्हाध्यक्ष सौ वंदनाताई शेंडे या करणार असून भाजप कार्यकर्ते व जनतेचा सहभाग असणार आहे, जनतेने व कार्यकर्त्यांनी जास्तीत जास्त संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या वतीने करण्यात आले आहे,

भारतीय जनता पक्षाचे प्रसिद्धी प्रमुख रवी बोकारे यांनी प्रसिद्धीपत्रकाद्वारे कळविले आहे.

Previous articleसमाजपरिवर्तनासाठी पुण्यश्लोक अहिल्यादेवींचा आदर्श आत्मसात करावा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here