मूल (जि. चंद्रपूर) :
शेतकरी आदित्य गेडाम यांच्या शेतात झुकलेला वीज पोल अखेर हटवून नवीन पोल बसवण्यात आला आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे शहराध्यक्ष अकाश येसनकर यांच्या सततच्या पाठपुराव्यामुळे ही कारवाई शक्य झाली.
शेतात दररोज होणाऱ्या हालचालींमुळे धोका निर्माण झाला होता. येसनकर यांनी वेळेवर आवाज उठवत विभागाला निवेदन दिलं आणि तातडीने उपाययोजना केली.
‘पब्लिक पंचनामा’ व ‘मूल दर्पण’ या माध्यमांनी हा मुद्दा पुढे नेल्याबद्दल आदित्य गेडाम या शेतकऱ्याने सुटकेचा निःश्वास सोडला.





