मूल:- चिचाळा गावात वयोवृद्ध, दिव्यांग व अशक्त नागरिकांसाठी घरपोच बँकिंग सेवा सुरू करण्याची मागणीचिचाळा गावातील अनेक वयोवृद्ध (६५ वर्षांहून अधिक वयाचे), ४०% पेक्षा जास्त अपंगत्व असलेले दिव्यांग, तसेच गंभीर आरोग्यस्थितीमुळे चालू-फिरू न शकणाऱ्या अशक्त नागरिकांना बँकेत जाऊन आर्थिक व्यवहार करणं अत्यंत कठीण झाले आहे. त्यांच्या पेन्शन, शासकीय योजनांचा लाभ, DBT व इतर बँक व्यवहार वेळेवर व सुलभपणे मिळावे यासाठी घरपोच बँकिंग सेवा सुरू करण्याची मागणी बँक ऑफ इंडिया, शाखा चिचाळा येथे करण्यात आली.
ही मागणी ग्रामस्थांनी दिनांक २२ जुलै २०२५ रोजी अधिकृत निवेदनाच्या माध्यमातून शाखा व्यवस्थापकांना सादर केली. या वेळी प्रविण बोबाटे, सूरज टिकले, अमोल येलकिंवार, गुरूदास भेंडारे, बाळू डोहने, रोशन भेंडारे, कुणाल यापाकूलवार, व देवानंद लेनगुरे तसेच इतर ग्रामस्थ उपस्थित होते.





