ABP माझाच्या झीरो अवर कार्यक्रमात “लाडकी बहीण”चा पुनर्विचार गरजेचा?, या विषयावर बोलताना माजी अर्थमंत्री आ. सुधीर मुनगंटीवार यांनी आपली अभ्यासपूर्ण, अनुभवसिद्ध आणि आर्थिक दूरदृष्टीने परिपूर्ण मांडणी सादर केली. आकडेवारीवर आधारित परखड विश्लेषण, वास्तवदर्शी भूमिका आणि अर्थसंकल्पीय शिस्तीचा ठोस आग्रह यामुळे त्यांनी चर्चेचा रोखच बदलून टाकला. लाडकी बहीण योजना राबवताना काहीही अडचण नाही, असे आ. मुनगंटीवार यांनी ठामपणे सांगितले. सर्व मुद्द्यांना स्पर्श करणारी ही भूमिका राज्यासाठी मार्गदर्शक ठरावी अशीच होती.





