आमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी 

0
91

मूल:- राज्याचे माजी मंत्री मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त 30 जुलै ला नंदूभाऊ रणदिवे मित्रपरिवारातर्फे मुल येथे विविध कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले आहे. यात सकाळी गणेश मंदिर येथे महाआरती ,दुपारी वृद्धांना काट्यांचे वाटप, अंध- दिव्यांग विद्यालयांमध्ये विद्यार्थ्यांना पुस्तक वाटप व भोजनदान, बालविकास प्राथमिक शाळा मुल येथे विद्यार्थ्यांना पुस्तक व नोटबुक वाटप तर सायंकाळी गांधी चौक येथे आमदार मुनगंटीवार यांच्या जीवनावरील गाण्यांचा ऑर्केस्ट्रा त्यानंतर गांधी चौक येथील समारोपीय कार्यक्रमात केक कापून महाप्रसाद वितरित करण्यात येईल कार्यक्रमाला भाजपा पदाधिकारी कार्यकर्ते व नागरिकांनी उपस्थित राहावे असे आवाहन नंदूभाऊ मित्रपरिवार तर्फे भाजप युवा नेते शहराध्यक्ष राकेश ठाकरे भाजप नेते प्रशांत बोबाटे, सुधीर भोयर, सुरज मांदाळे यांनी केले आहे.

Previous articleछत्रपतींचे वारसदार घरी आले… ही आमच्यासाठी गौरवाचीच बाब! – आ. सुधीर मुनगंटीवार
Next articleआमदार मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त विविध कार्यक्रमांची मेजवानी 

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here