मुनगंटीवार यांच्या वाढदिवसानिमित्त गणवेश,स्टडी टेबल व मसाले भाताचे वाटप ; सुभाष शाळेचा उपक्रम

0
219

मूल:- विकासाची सतत कास घेऊन मूल तालुक्याबरोबरच शहराचा देखील चेहरा मोहरा बदलविणाऱ्या विकास पुरुष म्हणून संबोधले जाणारे व्यक्तिमत्व माजी मंत्री तथा आमदार सुधीर मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून विद्या प्रसारण मंडळ मूल द्वारा संचलित सुभाष उच्च प्राथमिक शाळा मूल येथे गरीब १४२ विद्यार्थ्यांना गणवेश वाटप, दोन गरीब होतकरू विद्यार्थ्यांना निलेश राय यांचा तर्फे स्टडी टेबल, सर्व विद्यार्थ्यांना मसाले भाताचे वितरण कार्यक्रमाचे आयोजन थाटात करण्यात आले. शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांच्या अध्यक्षतेखील आयोजित या कार्यक्रमाला प्रमुख पाहुणे म्हणून शाळा सल्लागार समितीचे सदस्य प्रकाश नंदाराम, रुपेश पाटील मारकवार, प्रा.चंद्रकांत मणियार, गीताचार्य गणेश मांडवकर, सुखदेव चौथाले,

नगर परिषद मूलचे माजी सभापती महेंद्र करकाडे, प्रसिद्ध उद्योजक निलेश रायकटीवार, प्रा. संजय येरोजवार , माजी नगराधक्ष उषा शेंडे, माजी सैनिक मारोती कोकाटे, शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप, समितीच्या पदाधिकारी सुवर्णा पिपरे, इंदु मडावी तसेच सर्व समित्यांचे पदाधिकारी, पालक वर्ग मोठ्या संख्येने उपस्थित होते.

उपस्थित मान्यवरांनी यावेळी शाळेच्या कार्याचा गौरव केला. तसेच शाळेचा चेहरा मोहरा बदलविणाऱ्या शाळेचे अध्यक्ष नरसिंग गणवेनवार यांचा कार्याचा गौरव केला. पैसे सर्वांकडे असते मात्र तो दीन, दुबळे,गरजू व गरीब विद्यार्थ्यांना काही प्रमाणात खर्च करण्याची मनातील भाव सर्वांमध्ये नसतो. तो भाव नरसिंगभाऊ गणवेनवार यांचेकडे असल्याचा आवर्जून उल्लेख आपल्या प्रास्ताविक भाषणात शाळेचे सचिव तथा मुख्याध्यापक अविनाश जगताप यांनी करीत त्यांचे अभिनंदन केले. यावेळी १४२ गरीब विद्यार्थ्यांना नरसिंग गणवेनवार रुपेश पाटील मारकवार, प्रकाश नंदाराम यांचेकडून गणवेश वितरण करण्यात आले. प्रसिद्ध उद्योजक निलेश रायकटीवार यांचेकडून दोन गरीब विद्यार्थ्यांना दोन स्टडी टेबल मान्यवरांच्या हस्ते देण्यात आले. नंदूभाऊ मित्र परिवार राकेश ठाकरे, प्रशांत बोबाटे, सुधीर भोयर, सुरज मांदाळे यांचा तर्फे सर्व विद्यार्थ्यांना नोटबुक चे वाटप करण्यात आले. प्रकाश नंदाराम यांनी त्यांचा वाढदिवसा निमित्त विद्यार्थ्यांना सॉक्स व शूज वितरण करणार असल्याचे सांगितले. तसेच प्रा. संजर येरोजवार यांच्या वाढदिवसानिमित्त ४  विद्यार्थ्यांना कम्प्युटर टेबल व संस्थेला आलमारी देण्याचे आपल्या भाषणातून सांगितले. मुनगंटीवार यांच्या वाढदिवसा निमित्याने आयोजित कार्यक्रमाला बहुसंख्येने पालक उपस्थित होते.

Previous articleसुधीरभाऊ हे आमचे दैवत ; राकेश ठाकरे मुल
Next articleनंदूभाऊ मित्र परिवारातर्फे आमदार सुधीर मुनगंटीवार यांचा वाढदिवस विविध उपक्रमांनी साजरा

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here