मूल:- (प्रतिनिधी )महाराष्ट्राचे लोकनेते माजी मंत्री आमदार सुधीरभाऊ मुनगंटीवार यांच्या वाढदिवसाचे औचित्य साधून भारतीय जनता पक्ष महिला मोर्चा मुल शहराच्या वतीने भव्य मॅरेथॉन स्पर्धेचे आयोजन करण्यात आले, स्पर्धा हि तीन गटात घेण्यात आली , महिला, युवती व पुरुष अश्या तीन गटात घेण्यात आलेल्या स्पर्धेत प्रत्येक गटात प्रथम पारितोषिक 3000 रु रोख, द्वितीय पारितोषिक 2000 रु रोख, तृतीय पारितोषिक 1000 रु रोख व प्रोत्साहनपर पारितोषिक रोख रु 500 देण्यात आले.
महिला गट
प्रथम -सपना बल्लमवार,द्वितीय -स्वाती टिंगुसले,तृतीय -मनीषा गड्डेवार तर प्रोत्साहनपर पारितोषिक अश्विनी सोनुले यांना प्राप्त झाले.
युवती स्पर्धेत
प्रथम आचल कडुकर, द्वितीय साक्षी पोलोजवार, तृतीय तेजस्विनी कामडे तर प्रोत्साहनपर पारितोषिक वैशाली मालेकर यांनी प्राप्त केले.
पुरुष गटात
प्रथम यश धांडेकर, द्वितीय रोहन भुरसे , तृतीय सौरभ कन्नके, तर प्रोत्साहनपर पारितोषिक जागृत मोहूर्ले व स्वयं उसेवार यांनी प्राप्त केले.
सर्व विजेत्यांना सायंकाळी माता कन्यका मंदिरात झालेल्या महाआरती नंतर पारितोषिक वितरित करण्यात आले.
महिला व युवती गटातील स्पर्धकांना गांधी चौक ते उपजिल्हा रुग्णालय चौक अशी मॅरेथॉन तर पुरुष गटात गांधी चौक ते सोमनाथ रोडवरील घोडे देव ते परत अशी स्पर्धा घेण्यात आली, स्पर्धेत शेकडोच्या संख्येने स्पर्धकांनी सहभाग नोंदविला, स्पर्धेच्या यशस्वीतेसाठी भारतीय जनता पक्ष महिला मोर्चाच्या संपूर्ण महिला व युवतींनी अथक परिश्रम घेतले.





