मूल येथे स्वातंत्र्यदिनानिमित्त उम्मीद मल्टिपर्पज फाउंडेशनच्या वतीने आयोजित रक्तदान शिबिर यशस्वीरीत्या संपन्न एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदान आवश्यक – डॉ. गजानन चौधरी

0
165

मूल:- स्वातंत्र्यदिनानिमित्त मूल शहरात शासकीय, निमशासकीय कार्यालये, शाळा, महाविद्यालये, शैक्षणिक संस्था, राजकीय व सहकारी स्तरावर विविध कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. त्याचप्रमाणे या निमित्ताने उमेद मल्टिपर्पज फाउंडेशन मूल यांच्या वतीने रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात सुमारे ३० रक्तदात्यांनी सहभाग नोंदविला. रक्तदान शिबिराचे आयोजन स्थानिक उपजिल्हा रुग्णालयात करण्यात आले होते.

या रक्तदान शिबिरासाठी कर्मवीर मा. सा. कन्नमवार शासकीय वैद्यकीय महाविद्यालय व जिल्हा सामान्य रुग्णालय, चंद्रपूर येथील पथक मूल उपजिल्हा रुग्णालयात आले होते. पावसाचे वातावरण असूनही अनेक रक्तदाते रक्तदानासाठी उपजिल्हा रुग्णालय, मूल येथे आले होते. या प्रसंगी ग्राम चिमडा येथील माजी सरपंच डॉ. गजानन चौधरी यांनी सध्याच्या काळात एखाद्याचे प्राण वाचविण्यासाठी रक्तदानाची गरज व रक्तदानाचे महत्त्व याबाबत मार्गदर्शन करताना उम्मीद मल्टिपर्पज फाउंडेशन मूल यांच्या वतीने जनहित व समाजहितासाठी राबविण्यात येणाऱ्या विविध उपक्रमांबरोबरच रक्तदान शिबिरासारख्या उपक्रमांचे कौतुक केले.

उम्मीद मल्टिपर्पज फाउंडेशनचे सचिव इम्रान खान यांनी रक्तदान करणाऱ्या रक्तदात्यांसह रक्तदान संपल्यानंतर उशिरा आलेल्या इच्छुक रक्तदात्यांचे, तसेच रक्तदान प्रक्रिया पार पाडणाऱ्या चंद्रपूर येथील पथकाचे आणि शिबिर यशस्वी करण्यासाठी मेहनत घेणाऱ्या फाउंडेशनचे सदस्य निलेश गेडाम, सुमेध पेंदोर, प्रतीक म्हशाखेत्री, नावेद पठाण व इतर सहकाऱ्यांचे आभार मानले.

Previous articleस्वातंत्र्य दिनानिमित्त खाऊ वाटप ; श्री साई मित्र परीवार यांचा उपक्रम
Next articleसावली येथे भव्य दहीहंडी स्पर्धेचे आयोजनअभिनेत्री सोनाली कुलकर्णी यांची उपस्थिती साथ फाउंडेशन व रोहितभाऊ बोम्मावार मित्र परिवाराचे आयोजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here