मूल शहरातील मोकाट जनावरांचा बंदोबस्त करा अन्यथा तीव्र आंदोलन – नंदकिशोर रणदिवे यांचा इशारा

0
97

मूल शहरातील  रणदिवे यांचा इशारा चल (ता. मूल) – मूल शहरातील मुख्य रस्त्यांवर मोकाट जनावरे दिवसेंदिवस वाढत असून, त्यामुळे अपघातांचे प्रमाण वाढले आहे. याबाबत वेळोवेळी प्रशासनाच्या निदर्शनास आणून दिले असतानाही अद्याप ठोस उपाययोजना करण्यात आलेली नाही. याविरोधात आता माजी उपाध्यक्ष नगर परिषद नंदकिशोर रणदिवे यांनी तीव्र संताप व्यक्त करत तात्काळ मोकाट जनावरांचा बंदोबस्त न झाल्यास नगर परिषदेसमोर आंदोलनाचा इशारा दिला आहे.

दिनांक ८ सप्टेंबर २०२५ रोजी नगर परिषद मुख्याधिकारी यांना निवेदन देण्यात आले. यामध्ये शहरात मुख्य रस्त्यांवर बसलेल्या मोकाट जनावरांमुळे वाहतूक कोंडी, अपघात आणि नागरिकांना होणारा त्रास याचा उल्लेख करून त्वरित कारवाईची मागणी करण्यात आली आहे.

या निवेदनप्रसंगी नंदकिशोर रणदिवे यांच्यासोबत नगर परिषदेचे मा. सभापती अनिल साखरकर, भाजपा महामंत्री प्रशांत बोबाटे, राकेश ठाकरे, सुधीर भोयर, राहुल जिरकुंडवार, आशिष गुंडवार, गोपाल बल्लावार तसेच अनेक नागरिक उपस्थित होते.

“शहरातील नागरिकांचा जीव धोक्यात आहे. वेळेवर उपाययोजना न झाल्यास आम्ही आंदोलन छेडू,” असा इशारा श्री. रणदिवे यांनी दिला आहे.

Previous articleभा.ज.पा. चा मूलशहर युवा मोर्चा अध्यक्षपदी पंकजभाऊ लाडवे यांची निवड
Next articleपोलीस अधिकारी-कर्मचाऱ्यांना गृहकर्ज मंजुरीबाबत आ. सुधीर मुनगंटीवार यांनी घेतली वित्त विभागाच्या अपर मुख्य सचिवांची भेट

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here