जिल्हा स्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत मूल चे खेळाडू अव्वल

0
353

मुल:- दि.10 सप्टेंबर बुधवारला चंद्रपूर येथे जिल्हास्तरीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धां पार पडली . दरवर्षी प्रमाणे मूल तालुक्यातील क्रीडा संकुल चे वेटलिफ्टिंगचे प्रशिक्षक करण सुरेश कोसरे यांच्या कडे प्रशिक्षण घेत असलेले विविध शाळेतील खेळाडूंनी मूल तालुक्याचे प्रतिनिधित्व केले या स्पर्धेत मूल तालुक्यातील नवभारत कन्या विद्यालय, बल्लारपूर पब्लिक स्कूल, कर्मवीर महाविद्यालय, सेन्ट अन्स पब्लिक स्कूल, नवभारत कन्या विद्यालय तसेच क्रिस्टल कॉन्व्हेंट अशा विविध शाळेच्या खेळाडूंनी मूल तालुक्यातर्फे प्रतिनिधित्व केले. या स्पर्धेत एकूण सात खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकावून घवघवीत विजय संपादन केलेला आहे. यामध्ये 17 वर्षा आतील मुलींमध्ये 44 किलो वजन गटांमध्ये स्वरा गांगरेडिवार, 48 किलो वजन गटांमध्ये श्रावणी आंबूलकर, 53 किलो वजन गटांमध्ये तेजस्वी चौखूंडे 67 किलो वजन गटांमध्ये सांची लाकडे तर मुलांमध्ये 67 किलो वजन गटात साई बद्देलवार आणि 98 किलो ओपन वजन गटांमध्ये शुंखल आंबटकर तर 19 वर्षाखालील मुलींमध्ये 48 किलो वजन गटात श्रुती लोणबले या खेळाडूंनी प्रथम क्रमांक पटकाविलेला आहेे विजय खेळाडू पुढे होणाऱ्या नागपुर विभागीय शालेय वेटलिफ्टिंग क्रीडा स्पर्धेत चंद्रपूर जिल्ह्याचे प्रतिनिधित्व करणार आहे तालुक्याचे ठिकाण असलेले मूल शहर क्रीडा क्षेत्रात भरभरून कार्य करीत आहे असे दिसून येत आहे याचे प्रत्यक्ष उदाहरण म्हणजे वेटलिफ्टिंग या क्रीडा प्रकारात मूर शहराने आपले वर्चस्व प्रस्थापित केलेले दिसून येत आहे याचे कारण असे की गेल्या तीन वर्षापासून मुल मध्ये वेटलिफ्टिंगला सुरुवात झाली आणि सहाजिकच सुरुवातीपासूनच या खेळाडूंनी क्रीडा क्षेत्रात भरीव काम केलेले आढळून येत आहे आणि सलग यंदाही चंद्रपूर जिल्ह्यात वेटलिफ्टिंग मध्ये मूल शहराचेच नाव अव्वल ठरलेले दिसून येत आहे मुल तालुक्याचे क्रीडा अधिकारी विनोद ठिकरे सर, तालुक्याचे क्रीडा संयोजक नामदेवजी पिजुरकर सर पी टी आय अमोल रामटेके सर, रूपचंद उराडे सर, दिनेश जिद्दीवार सर आकाश चौधरी सर स्वप्निल अवघडे सर यांच्यातर्फे खेळाडूंना पुढील वाटचालीस शुभेच्छा देण्यात आल्या.

Previous articleअत्याधुनिक बॅडमिंटन हॉलमुळे जिल्ह्यातील खेळाडू आंतरराष्ट्रीय स्तरावर नावलौकीक प्राप्त करतील
Next articleअपघातग्रस्तांसाठी तात्काळ धावून आले आ. सुधीर मुनगंटीवार ताफा थांबवून जखमींना रुग्णालयात पोहोचविण्याची केली व्यवस्था

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here