मूल शहरातील इंदिरानगर वार्डातील सरकारी गोडाऊनच्या मागे आज भीषण आग लागल्याची घटना घडली. आग लागल्याची माहिती मिळताच परिसरात एकच खळबळ उडाली.दरम्यान, स्थानिक नागरिकांनी प्रसंगावधान राखत स्वतःच आग विझवण्याचा प्रयत्न सुरू केला. आगीची तीव्रता लक्षात घेता परिसरात भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे.
घटनेची माहिती मिळताच नगर परिषदेचे उपाध्यक्ष राकेश रत्नावार, सभापती नलिन आडपवार, नगरसेवक विवेक मुत्त्यालवार, राहुल प्रेमलवार, सुशीला खोब्रागडे, प्राची आक्केवार यांनी तात्काळ घटनास्थळी भेट देऊन परिस्थितीचा आढावा घेतला. त्यांनी प्रशासनाला आग तातडीने आटोक्यात आणण्याचे निर्देश दिल्याची माहिती मिळाली.





