सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी स्त्री समतेचे आद्य पुरस्कर्ते – प्रिया अलोने तळोधी (बा) येथे महिला दिनानिमित्त संवाद व सन्मान सोहळा संपन्न

0
40

तळोधी (बा):- सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामी विचारमंच तळोधी (बा) व प्रगती दिव्यांगमंच संघटना तळोधी (बा) यांच्या वतीने रविवार दि. २२ मार्च रोजी जागतिक महिला दिनानिमित्त ‘संवाद व सन्मान सोहळा’ या कार्यक्रमाचे आयोजन जूनी कन्या शाळा, उमेद कार्यालय, तळोधी (बा) येथे करण्यात आले.

महानुभाव धर्मप्रवर्तक, सामाजिक क्रांतीचे आद्य प्रणेते सर्वज्ञ श्रीचक्रधर स्वामींनी सुमारे बाराव्या शतकात महिलांच्या अन्याय, अत्याचार, शोषण, कर्मकांड व अंधश्रद्धा यावर आपल्या तत्वज्ञानाच्या माध्यमातून जोरदार प्रहार करून त्यांना सामाजिक समता, न्याय, हक्क व दर्जा प्राप्त व्हावा व त्यांच्यातील अज्ञानता दूर व्हावी यासाठी महाराष्ट्रभूमीत सर्वप्रथम कृतिशील प्रयत्न केला व आरोग्य, स्वच्छता, शिक्षण व ज्ञानाचे महत्व प्रतिपादन करून सशक्त स्त्री निर्माण केली व त्यांच्या प्रेरणेने महाराष्ट्राच्या मातीला मराठी भाषेतील पहिली आद्य कवयित्री महदंबा ऊर्फ महदाइसा लाभली असे विचार कार्यक्रमाच्या अध्यक्षा सौ. प्रिया अलोने यांनी व्यक्त केले. यासोबतच त्यांनी दिव्यागांच्या समस्या व प्रश्नांना वाचा फोडून त्यांचे हक्क, अधिकार, विविध शासकीय योजना यावर सविस्तर मार्गदर्शन केले. यावेळी कोरो इंडिया मुंबईच्या प्रतिनिधी कौतुक मेश्राम, सामाजिक कार्यकर्त्या संगिता तुमडे, कुरखेडा, सुनिताताई म्हस्के, रेखा मेश्राम, यांनी विचारमंचावर उपस्थित राहून महिलांच्या विविध प्रश्नांवर चर्चा करून संवाद साधला.

याप्रसंगी बांबू लेडी सौ. मिनाक्षी वाळके चंद्रपूर, सामाजिक कार्यकर्त्या सौ. मंगलाताई अगडे, तळोधी (बा) व ग्रा.पं. वाढोणा येथील माजी सरपंच व सामाजिक कार्यकर्त्या श्रीमती मिनाताई मेश्राम यांच्या कार्यकर्तृत्वाचा गौरव करून जाहीर सत्कार करण्यात आला.

या कार्यक्रमाचे स्वागतपर मनोगत सर्वज्ञ विचारमंचचे अध्यक्ष विलास रामटेके, प्रास्ताविक निकेश अलोने, सुत्रसंचालन तुलशी गेडाम व आभार तुलोपचंद गेडाम यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सर्वज्ञ विचारमंचचे प्रा. तृषाल रामटेके, प्रविण खोब्रागडे, प्रशांत रामटेके, गजू मेश्राम, डॉ. नितेश रामटेके, प्रणव खंदारकर, अशोक रामटेके, अरूण खोब्रागडे, दिनेश उके, कियाताई ठोमरे , अनिता बावणकर, छाया डोहे, वैशाली शामकुळे यांनी परिश्रम घेतले.

Previous articleमुल शहरातील इंदिरानगर मध्ये आग; नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण 
Next articleचंद्रपूरच्या झरपट नदी पुनरुज्जीवनासाठी विधानसभेत आ. सुधीर मुनगंटीवार यांची जोरदार मागणी नागरिकांचा विनंती अर्ज विधानसभेत सादर

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here