मूल नगरीतील सर्व समाज बांधव, भगिनी, युवक युवती अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषदेचे कार्यकर्ते व पदाधिकारी तसेच विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते व पदाधिकारी , सर्व राजकीय पक्षाचे कार्यकर्ते व पदाधिकारी यांना कळविण्यात येते की,महात्मा जोतीराव फुले यांच्या २०० व्या जयंती वर्षाच्या निमित्ताने ‘महात्मा जोतिबा फुले ‘यांच्या जीवनावर प्रकाश टाकणारा चित्ररथ दि.15/5/2026 रोज शुक्रवारला सकाळी 8.00वाजता चंद्रपूर वरून मुल नगरीत दाखल होणार आहे.यानिमित्ताने महात्मा ज्योतिराव फुले चित्ररथाचे स्वागत व अभिवादन करण्यासाठीं आपण सर्व उपस्थित राहावे ही नम्र विनंती. स्वागत व अभिवादनाची रूपरेषा-इको पार्क, उपजिल्हा रुग्णालय चंद्रपूर रोड मुल येथे चित्ररथाचे आगमना निमित्त स्वागत व अभिवादन, बाईकने चित्ररथासोबत तहसील कार्यालयाजवळ दहा मिनिटे थांबणार, पुढे गांधी चौक येथे चित्ररथातील महामानवांच्या पुतळ्यांना अभिवादन करण्यासाठी चित्ररथ उपलब्ध असेल. पुढे बाजार रोड, चामोर्शी नाका मुल वरून पुढे डोंगरगाव, राजोली, शिंदेवाही, तळोधी, नागभीड, ब्रह्मपुरी येथे चित्ररथाचा स्वागत व अभिवादन करण्यात येईल. आपले विनीत—अखिल भारतीय महात्मा फुले समता परिषद जिल्हा चंद्रपूर तथा सर्व सामाजिक संघटना मुल.





