जि.प. निवडणुकांआधी विधान परिषद निवडणूक नकोच वर्धा-चंद्रपूर-गडचिरोलीसाठी रुपेश पाटील मारकवार यांची ठाम मागणी

0
57

मुल:- राजगड येथिल सामाजिक कार्यकर्ते रुपेश पाटील मारकवार यांनी जिल्हा परिषद व पंचायत समितीच्या निवडणुका होईपर्यंत वर्धा, चंद्रपूर, गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाची विधान परिषद निवडणूक घेऊ नये, अशी मागणी केली आहे. सध्या तीनही जिल्ह्यांत प्रशासक असल्याने मतदारच अस्तित्वात नसल्याचा त्यांचा दावा आहे.

विधान परिषदेच्या स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघात जिल्हा परिषद सदस्य, पंचायत समिती सदस्य, नगरसेवक हे मतदार असतात. वर्धा, चंद्रपूर व गडचिरोली जिल्हा परिषदांची मुदत संपून 2 वर्षांपेक्षा अधिक काळ लोटला आहे. निवडणुका न झाल्याने तिन्ही जिल्ह्यांत प्रशासक नियुक्त आहेत.

 

*रुपेश पाटील मारकवार म्हणाले:*

“मतदारच नसताना निवडणूक घेणे म्हणजे लोकशाहीची थट्टा आहे. स्थानिक स्वराज्य संस्थांचे प्रतिनिधी हेच या निवडणुकीचे मूळ मतदार आहेत. त्यांच्या अनुपस्थितीत होणारी निवडणूक घटनात्मकदृष्ट्या योग्य ठरणार नाही. शासनाने आधी जि.प. व पं.स. निवडणुका घ्याव्यात. लोकप्रतिनिधी निवडून आल्यानंतरच विधान परिषदेची प्रक्रिया सुरू करावी.”

वर्धा-चंद्रपूर-गडचिरोली स्थानिक स्वराज्य संस्था मतदारसंघाच्या विद्यमान आमदारांची मुदत जुलै 2026 मध्ये संपत आहे. निवडणूक आयोगाकडून लवकरच निवडणूक कार्यक्रम जाहीर होण्याची शक्यता आहे. मात्र जि.प. निवडणुका रखडल्याने या मतदारसंघातील सुमारे 85% मतदार सध्या अस्तित्वातच नाहीत.

Previous articleमूल नगर परिषद कंत्राटी सफाई कामगारांचा अखिल भारतीय सफाई मजदूर युनियनमध्ये सामूहिक प्रवेश

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here