डोनी फाट्याजवळील धोकादायक खड्डे स्वराज्य स्वाभिमानी संघटनेकडून बुजविण्याचा उपक्रम अपघात प्रतिबंधासाठी युवकांचा सामाजिक बांधिलकीतून पुढाकार

0
151

चंद्रपूर–मूल राष्ट्रीय महामार्गावरील डोनी फाट्याजवळ मोठ्या प्रमाणात खड्डे निर्माण झाल्याने वाहनचालकांना गंभीर अडचणींचा सामना करावा लागत होता. या धोकादायक परिस्थितीमुळे परिसरात वारंवार अपघात घडत असल्याची बाब निदर्शनास आली होती. संभाव्य जीवितहानी टाळण्याच्या उद्देशाने स्वराज्य स्वाभिमानी संघटनेने सामाजिक बांधिलकीची जाणीव ठेवत रस्त्यावरील खड्डे बुजविण्याचा उपक्रम हाती घेतला.

संघटनेच्या कार्यकर्त्यांनी सामूहिक सहभागातून रस्त्यावरील धोकादायक खड्डे सिमेंट काँक्रीटच्या साह्याने बुजवून वाहनचालकांना तात्पुरता दिलासा मिळवून दिला. या उपक्रमाचे नागरिकांकडून सकारात्मक स्वागत करण्यात आले असून संबंधित प्रशासनाने महामार्गाची कायमस्वरूपी दुरुस्ती करून सुरक्षित व सुरळीत वाहतुकीची व्यवस्था सुनिश्चित करावी, अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात येत आहे.

यावेळी स्वराज्य स्वाभिमानी संघटनेचे अध्यक्ष आकाश कावळे यांच्यासह शुभम मुत्यालवार, नमेश मेश्राम, अक्षय गगपल्लीवर, आकाश निकुरे, अक्षय जराते, राम गाजेवर, गणेश मंथनवार, अनंता रस्से, घोटेकर सर, प्रशांत मुत्यारपवार आदी उपस्थित होते.

Previous articleभाजपाच्या नवनियुक्त जिल्हा पदाधिकाऱ्यांचा मूल शहर भाजपाच्या वतीने सत्कार
Next articleखैरे कुणबी समाजाचा गुणवंत विद्यार्थी सत्कार सोहळा उत्साहात संपन्न नवनियुक्त लोकप्रतिनिधी व 10वी-12वीच्या विद्यार्थ्यांचा सन्मान, करिअर मार्गदर्शनालाही प्रतिसाद

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here