चंद्रपूर प्रतिनिधी:- कुमुदिनी भोयर : खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळ, चंद्रपूर यांच्यावतीने आयोजित गुणवंत विद्यार्थी सत्कार व करिअर मार्गदर्शन शिबीर रविवार, दि. 7 जून 2026 रोजी सी.डी.सी.सी.बँक सभागृह, नागपूर रोड चंद्रपूर येथे मोठ्या उत्साहात पार पडला.
चंद्रपूर जिल्ह्यातील खैरे कुणबी समाजातील नवनियुक्त नगराध्यक्ष अरुण धोटे नगरसेवक, पत्रकार कुमुदिनी भोयर तसेच 2024-25 मध्ये शासकीय सेवेत निवड झालेले कर्मचारी आणि इयत्ता 10वी व 12वी मधील गुणवंत विद्यार्थ्यांचा यावेळी शाल, श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सन्मान करण्यात आला.
कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी माजी आमदार राजुरा मा. सुभाषभाऊ धोटे होते. उद्घाटन वरोरा विधानसभा क्षेत्राचे आमदार मा. करणभाऊ देवतळे यांच्या हस्ते झाले. स्वागताध्यक्ष म्हणून खैरे कुणबी समाज स्नेह व सांस्कृतिक मंडळाचे अध्यक्ष मा. डॉ. विजयराव देवतळे उपस्थित होते.
*विद्यार्थ्यांना करिअरचे धडे*
शिवाजी हायस्कूल तथा कनिष्ठ महाविद्यालय, चामोर्शी चे मा. प्रा. पंकज नरुले यांनी विद्यार्थ्यांना उच्च शिक्षण, स्पर्धा परीक्षा व करिअरच्या विविध संधींबद्दल सविस्तर मार्गदर्शन केले. विद्यार्थी व पालकांनी मार्गदर्शनाला उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
कार्यक्रम यशस्वी करण्यासाठी मंडळाचे अध्यक्ष डॉ. विजयराव देवतळे, सचिव जे.डी. पोटे, कोषाध्यक्ष नामदेव लढी,सहसचिव दिनकर ठोंबरे, अरुण भोयर, अरूण वाकुलकर यांच्यासह सर्व पदाधिकारी व सदस्यांनी परिश्रम घेतले.संचलन नोमाजी झाडे यांनी तर आभार प्रा. निलेश ढेकरे यांनी मानले.
कार्यक्रमाला मोठ्या संख्येने समाज बांधव व विद्यार्थी पालकांसह उपस्थित होते.





