चंद्रपूर : मुल : सावली शहरात दिवसभर मुक्काम केल्यानंतर 30 हत्तींचा कळप आज मूल तालुक्यातील भोवरला मार्गाने शिरला आहे.
वन विभागाच्या माहितीनुसार, हा कळप अन्न आणि पाण्याच्या शोधात भटकंती करत आहे. रात्रीच्या वेळी विशेष काळजी घेण्याची सूचना वन अधिकाऱ्यांनी दिली आहे.
*नागरिकांसाठी सूचना:*
1. रात्रीच्या वेळी एकट्याने बाहेर जाऊ नये
2. शेतात आणि घराभोवती प्रकाश ठेवावा
3. हत्ती दिसल्यास 1926 या टोल-फ्री नंबरवर तात्काळ कळवावे
4. मुलांना आणि पाळीव प्राण्यांना सुरक्षित ठिकाणी ठेवावे
प्रशासनाकडून कळपावर नजर ठेवण्यात येत आहे. नागरिकांनी घाबरून न जाता सतर्क राहावे, असे आवाहन करण्यात आले आहे.





