शिवपूजन व रोजगार मेळाव्यास उत्स्फूर्त प्रतिसाद
वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला : सार्वजनिक शिवजयंती उत्सव समितीच्या उपक्रम सप्ताहाचा प्रारंभ रविवारी स्थानीय शिवाजी महाराज पार्क येथे मोठ्या उत्साहात करण्यात आला.
सकाळी माजी महापौर विजय अग्रवाल,समाजसेवी गणेशराव पावसाळे,समितीचे अध्यक्ष निरंजन पावसाळे,कार्याध्यक्ष पवन महल्ले,सचिव चंद्रकांत झटाले,शोभायात्रा प्रमुख पंकज जायले,संजय गायकवाड आदींच्या उपस्थितीत शिवाजी महाराजांच्या उंच पुतळ्यास हारार्पण व शिवध्वज पूजन करण्यात आले.परिसर फुलांनी सजविण्यात आला होता.मान्यवरांनी शिवजयंती उपक्रम सप्ताहाच्या उपस्थित शिवप्रेमींनी शुभेच्छा दिल्यात.या नंतर परिसरात रोजगार मेळाव्यास प्रारंभ करण्यात आला.या रोजगार मेळाव्यास बेरोजगार युवक युवतींनी उत्स्फूर्त प्रतिसाद देत मुलाखती दिल्यात.यात तब्बल 1500 युवक युवतींनी सहभाग घेत या अभिनव उपक्रमाची प्रशंसा केली.या रोजगार मेळाव्यात एंडूरन्स,संजीव ऑटो,वेरोक इंजि,रिंग गिअर, किंप्लास्ट,महिंद्र नाशिक,महिंद्र चव्हाण,इजम श्रीनिसम,धूत ट्रान्समिशन,दारुवाला आदी नामांकीत कंपन्या समवेत स्थानीय इक्विटास,एचडीएफसी,
आयसीआयसीआय,एक्सिस,श्रीराम फायनान्स,महेंद्र फायनान्स,एअरटेल आदी बँकांनी ही सहभाग घेत मुलाखती घेतल्यात.यात बारावी,आयटीआय पासून तो पदवीधर पर्यंतच्या उमेदवारानी गर्दी केली होती.
व्यवस्थापन पवन महल्ले यांनी केले.आज दि 14 फेब.रोजी सकाळी 11 वाजता समितीच्या वतीने विविध शाळा व महाविद्यालयात निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आहेत.तसेच स 11 वा शिवाजी महाराज पार्क येथे भव्य आरोग्य मेळावा होणार आहे.दि.15 फेब.रोजी सकाळी 10 वा.उत्सव समिती,शिवाजी महाविद्यालय मराठी विभाग व डॉ के एस पाटील मल्टी पर्पज फांऊंडेशनच्या संयुक्त विद्यमाने शिवाजी महाविद्यालयात राज्यस्तरीय वक्तृत्व स्पर्धा होणार आहे.यात विजेत्याला डॉ के एस पाटील शिववक्तृत्व चषक बहाल करण्यात येणार आहे.यात नर्सरी ते इयत्ता चौथी,इयत्ता पाचवी ते दहावी,वर्ग अकरा ते खुला गट असे तीन गट असून यात अनेक बक्षिसे ठेवण्यात आली असून या स्पर्धेचे पारितोषिक वितरण जयंती दिनी होणार आहे. या शिवपूजन व रोजगार मेळाव्यात प्रदीप शिंदे,सागर तिवारी,अनिल निंबाळकर, सुहास घोटे,पप्पू गुंजाळ, संदीप बाथो,राहुल लोहिया,जितेंद्र मित्रा,सोमन्ना कट्टेगार,विक्की लोहोकार, भारत भडंगे,भूषण देशमुख,पवन बुंदेले,अमित देशमुख,पंकज गाढवे,रोशन कसाब, कैलास पवार,पवन भिरड,सतीश फाले, अभिजत बांगर,अभिजित मूळे, ऋषी जगताप,शुभम साहू,प्रतीक खराडे, सोनू चव्हाण, अभिषेक पांडे,गणेश माने,यश दांडेकर,रणधीर ठाकूर, शुभम सोनोने, शुभम कावळे आदी उपस्थित होते





