रविवारी वीरस्त्री स्व.लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरिय निबंध स्पर्धेचे पारितोषिक वितरण

0
219

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला – स्वामिनी संघटनेच्या संस्थापिका वीरस्त्री स्व. लताताई देशमुख यांच्या स्मृतीत आयोजित केलेल्या राज्यस्तरिय निबंध स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा रविवार दि 27 फेब रोजी दु 1 वाजता स्थानीय सिव्हिल लाइन परिसरातील आयएमए सभागृहात आयोजित करण्यात आला आहे.महापौर सौ अर्चना मसने यांच्या अध्यक्षतेत संपन्न होणाऱ्या या सोहळ्यात प्रमुख पाहुणे म्हणून प्रा डॉ संतोष हुशे,उद्योजक विवेक मंत्री,एड मुकुंद जालनेकर,डॉ सीमा तायडे,डॉ मीनाक्षी मोरे,उद्योजिका जीनी वाघ,जी प सभापती सौ स्फूर्ती गावंडे,नगरसेविका उषा विरक,सेना महिला नेत्या सौ ज्योतसना चोरे,वंचित नेत्या प्रभाताई शिरसाट,महिला काँग्रेस नेत्या पुष्पाताई देशमुख,नगरसेविका सुमनताई गावंडे आदी मान्यवर उपस्थित राहणार आहेत.या सोहळ्यात स्पर्धकांनी मोठ्या संख्येने उपस्थित रहावे असे आवाहन स्वामिनी विधवा विकास मंडळ व संघटनेचे अध्यक्ष संजय कमल अशोक,जिल्हाध्यक्षा श्रीमती साधना पाटील,एड सुमित बजाज,सचिव श्रीमती प्रा सुनिताताई दाबेराव आदींनी केले.

Previous articleखा. संजयभाऊ धोत्रे यांच्या वाढदिवसानिमित्त महानगरात कचरापेटीचे वितरण
Next articleयुवा नेते सचिन कराळे यांची भाजप महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here