स्पर्धेत माजी आ गिरीश व्यास समवेत अनेक मान्यवरांची उपस्थिती
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला- गत तीन दिवसापासून कृषी उत्पन्न बाजार समितीच्या दालनात सुरू असलेल्या राज्यस्तरिय बुद्धिबळ स्पर्धेचा आज सोमवार दि 28 फेब रोजी साय 5 वाजता मान्यवरांच्या उपस्थितीत पारितोषिक वितरणाने समारोप होणार आहे. गत तीन दिवसापासून राज्यभरातील बुद्धिबळ स्पर्धकांची या स्पर्धेत गर्दी उसळली असून शह-काटशह यांची चुरस जोमाने खेळाडूत सुरू आहे. मुंबई, पुणे, नागपूर,सांगली, सातारा पासून उभ्या राज्यभरातील बुद्धिबळ स्पर्धक या स्पर्धेत सहभागी झाले आहेत.रविवारी सकाळी स्पर्धेच्या तृतीय सत्राचे उद्घाटन महाराष्ट्र गोवा बार कौन्सिलचे माजी अध्यक्ष व बीजीई सोसायटीचे अध्यक्ष एड मोतीसिंह मोहता यांच्या हस्ते तथा अकोला बार असो अध्यक्ष एड.चंद्रकांत वानखडे, एड.मिलिंद सांभरे, एड आशिष मो. देशमुख, ऍड श्रीकांत वखरे यांच्या उपस्थितीत करण्यात आले.यावेळी मान्यवरांचा शाल श्रीफळ व स्मृतिचिन्ह देऊन सत्कार करण्यात आला. तर दुपारच्या सत्रात नागपूरचे माजी आ. तथा महाराष्ट्राचे चेस असो.चे उपाध्यक्ष गिरीश व्यास, डॉ.रणजित सपकाळ, डॉ अनंतराव भुईभार,डॉ दीपक मोरे,डॉ चंद्रकांत पनपालिया,माजी सरकारी वकील गणेश पाठक, एड प्रकाश वखरे, गुजरात अंबुजा चे स्थानीय अध्यक्ष ब्रिजमोहन चितलांगे,छावाचे जिल्हाप्रमुख शंकरराव वाकडे,अ.भा. कॅरम संघटनेचे पदाधिकारी व रेडक्रॉसचे सचिव प्रभुजीतसिंह बचेर यांनी आपली उपस्थिती दर्शवून या स्पर्धा उपक्रमाचे स्वागत केले. मान्यवरांचे स्वागत बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे,अकोला महानगर चेस असो.चे अध्यक्ष संदीप पुंडकर, बाजार समितीचे उपसभापती निळकंठराव खेडकर, प्रकाश काळे,बुद्धिबळ असो चे सचिव जितेंद्र अग्रवाल, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर, प्रकाशराव काळे,गजानन पुंडकर, प्रवीण इंगोले,संचालक गणेशराव गावंडे आदींनी केले. गत तीन दिवसापासून या स्पर्धेत संस्कृती वानखडे ही राष्ट्रीय मानांकन प्राप्त करणारी स्पर्धक स्पर्धेचे आकर्षण ठरली.आज सोमवार दि 28 फेब्रुवारी रोजी आयोजित या समारोपीय सोहळ्यात क्रीडा रसिकांनी मोठ्या संख्येने उपस्थित राहण्याचे आवाहन कृषी उत्पन्न बाजार समितीचे सभापती शिरीष धोत्रे,अकोला महानगर चेस असोसिएशन अध्यक्ष संदीप पुंडकर, असो चे सचिव जितेंद्र अग्रवाल, व्यापारी मंडळाचे अध्यक्ष चंद्रशेखर खेडकर समवेत बाजार समितीच्या समस्त संचालक मंडळाने केले.





