75 हजार विद्यार्थी लिहिणार सर्वोदय दैनंदिनी; प्रा. बबनराव कानकिरड यांची माहिती

0
165

व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला: भारतीय स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव देशभर विविध उपक्रमाद्वारे साजरा होत आहे. विद्यार्थ्यांना जीवनाकडे पाहण्याची नवी दृष्टी मिळावी. उदयोन्मुख पिढीला भविष्याचा वेध घेता यावा सोबतच देशाचा गौरवशाली इतिहास अभ्यासण्यासाठी, विधायक रचनात्मक कार्यासाठी या अमृत महोत्सवी वर्षात ७५००० विद्यार्थी सर्वोदय दैनंदिनी लिहीणार असल्याची माहिती या उपक्रमाचे संयोजक व सर्वोदय मंडळाचे जिल्हाध्यक्ष बबनराव कानकिरड यांनी दिली.
या महत्वाकांक्षी उपक्रमासाठी प्रत्येक जिल्ह्यात १मार्च२०२२पासुन दैनंदिनी लेखन उद् बोधन कार्यशाळांचे आयोजन केले आहे. दैनंदिनी लिहल्याने हस्ताक्षर सुधारते.दैनंदिनीत आपण आपल्या रोजच्या घडामोडी, आपले विचार,भावना मांडतो . त्यामुळे वेळप्रसंगी भविष्याचा वेध घेता येतो.आपण आपली दैनंदिनी पुन्हा पुन्हा वाचु शकतो. त्यामुळे घडलेल्या घटना,त्यावरील आपली कृती व विचार यांमध्ये सर्जनशीलता वृद्धींगत होते.महत्वाच्या घटना,तपशील यांची नोंद ठेवण्याची सवय लागते.विद्यार्थ्यांच्या लेखनशैलीमध्ये सुधारणा होते.हा एक विधायक- रचनात्मक कार्यक्रम ठरणार आहे,यातुनच उदयोन्मुख भारतासाठी समाजसेवक संशोधक,सर्जनशील,चिंतनशील युवा पिढीची जडणघडण होईल असा आशावाद बबनराव कानकिरड यांनी व्यक्त केला आहे.

Previous articleयुवा नेते सचिन कराळे यांची भाजप महानगर उपाध्यक्षपदी नियुक्ती
Next articleराज्यस्तरिय बुद्धिबळ चाचणी स्पर्धेचा आज शानदार समारोप

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here