समाजात गोवंश संवर्धनाच्या प्रशिक्षणची गरज

0
172

आदर्श गोसेवा प्रकल्प येथे गोहत्या प्रतिबंध विधी पुस्तक ‘विमोचन संपन्न
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला- आज सुदृढ समाजाच्या सर्वकष उत्थानासाठी गोसंवर्धनाची अत्यंत गरज आहे.कृषी, कास्तकार व समाजाचा सर्वांगीण कायाकल्प करण्यासाठी सर्वांना गोवंश प्रशिक्षण गरजेचे असून यामुळेच गोमातेचा होत असलेला सर्वनाश थांबु शकेल असा आशावाद मान्यवरांनी व्यक्त केला.आदर्श गोसेवा व अनुसंधान केंद्र म्हैसपूर येथे गोवंश संवर्धन व गोवंश हत्या प्रतिबंधावर आधारित विधी पुस्तकाचा विमोचन व मार्गदर्शन कार्यक्रम मोठ्या उत्साहात संपन्न झाला. विधिज्ञ व गोप्रेमींसाठी आयोजित या सोहळ्यास उदघाटक म्हणून माजी न्यायधिश व गोवा राज्याचे लोकपाल न्याय.अंबादास जोशी उपस्थित होते तर प्रमुख पाहुणे म्हणून रा.स्व.संघाच्या गोरक्षा विभागाचे प्रमुख अमित महापात्रा,गोसेवा व अनुसंधान केंद्र पदाधिकारी व महा.गोवा बार काँसीलचे माजी अध्यक्ष एड मोतीसिह मोहता,आदर्श गोसेवा प्रकल्प संस्था अध्यक्ष सुभाष जैन,सचिव प्रा विवेक बिडवई,पुस्तक निर्माण व्यवस्था मधील सेवाधारी एड धीरज शुक्ला आदी मान्यवर उपस्थित होते.दीप प्रज्वलन व मान्यवरांच्या शाल श्रीफल सत्काराने या कार्यक्रमाचा प्रारंभ झाला. यावेळी मान्यवरांनी गोहत्या संदर्भात न्यायालतील ऐतिहासिक खटल्याची माहिती असणाऱ्या गोहत्या प्रतिबंधक कायद्याच्या पुस्तकाचे थाटात विमोचन करण्यात आले.
यावेळी माजी न्याय.जोशी यांनी उपस्थित विधिज्ञाना संबोधित करीत गोरक्षण विश्वात विधींज्ञाचे मोठे महत्व असल्याचे सांगून त्यांनी गोवंश वाचविण्याचे दायित्व ओळखून गो संवर्धनसाठी पुढे येण्याचे आवाहन करीत या उपक्रमाचे कौतुक केले.कार्यक्रमात माजी न्याय. जोशी यांचे अकोला, बालापुर, अचलपूर, शेगाव, दिग्रस, पुसद, पातुर, यवतमाळ, दारवा, शेगाव, सिंदखेड राजा समवेत पश्चिम विदर्भातील विविध तालुका व जिल्हा बार असो.च्या वतीने स्वागत करण्यात आले.अकोला बार असो.च्या वतीने न्याय.जोशी यांचे अध्यक्ष एड सी एन वानखडे,उपाध्यक्ष एड शंकर ढोले,महिला उपाध्यक्ष एड कांचन शिंदे,एड धीरज शुकला,एड सौरभ शर्मा,एड शाम खोटरे,ऍड आनंद गोदे,एड भूषण काळे,एड हेमंत मोहता, शासकीय अभियोक्ता देशपांडे,एड कृष्णा खोत,ऍड एस जी गवई,एड लखन बडदीया,एड ममता तिवारी,एड राखी वर्मा,एड केशव सानप, एड निशांत पाटील समवेत अनेक विधिज्ञांनी स्वागत केले.तसेच रा स्व सं चे गोपाल खंडेलवाल, अतुल गणात्रा यांनी स्वागतात सहभाग घेतला. प्रास्ताविक एड मोतीसिंह मोहता यांनी करून या पुस्तकाची उपयुक्तता प्रतिपादित केली.
या पुस्तकाच्या निर्मितीत योगदान देणारे एड धीरज शुक्ला,हरीश मानधने यांचा ही सत्कार कारण्यात आला.संचालन मंदार देशपांडे यांनी तर आभार संस्था अध्यक्ष सुभाष जैन यांनी मानले.अजिंक्य अलकरीच्या पसायदान व स्नेहभोजनाने या एक दिवसीय संमेलनाची सांगता झाली.या कार्यक्रमात ॲड सत्यनारायण जोशी,ॲड रवींद्र कोगदे,पराग शाह, दीपक खंडेलवाल,राजेश जैन,रवि चांडक, सुरेश खंडेलवाल,नरेश बजाज,ऍड पियुष देशमुख,ऍड अनुप देशमुख,एड हर्ष पाटील,एड अमोल अलोने,एड सुशील बोरा,एड दिनेश चाकर,प्रशांत पाटील,रमाकांत घोगरे,मुकुंद गिरी,डॉ जरांगे,डॉ ताले,डॉ अभय कुलकणी समवेत आदर्श गोसेवा अनुसंधान प्रकल्प व गो विकास ट्रस्टचे पदाधिकारी,अभियोक्ता वर्ग ,गोप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleमहानगरातील ऑटो चालकांना मोफत पीयूसी प्रमाणपत्राचे वितरण
Next articleवीरस्त्री स्व. लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here