प्रथम पुरस्कार वाशिम, द्वितीय जळगाव खान्देश, तृतीय रत्नागिरी तर अकोला ठरला बालेकिल्ला
व-हाड दूत न्यूज नेटवर्क
अकोला दि. 27 : वीरस्त्री स्व. लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात साजरा झाला. यामध्ये प्रथम पुरस्कार वाशिम द्वितीय जळगाव खान्देश, तृतीय रत्नागिरी तर अकोला जिल्हा बालेकिल्ला ठरला. स्वामिनी संघटना तथा स्वामिनी विधवा विकास मंडळाच्या संस्थापिका वीरस्त्री लताताई देशमुख यांच्या स्मृती प्रित्यर्थ आयोजित राज्यस्तरीय निबंध स्पर्धा आयोजित करण्यात आली होती. या स्पर्धेचा निकाल रविवारी जाहीर करण्यात आला.
कार्यक्रमाची सुरुवात संस्थापक वीरस्त्री स्व.लताताई देशमुख यांच्या प्रतिमेचे पूजन करून करण्यात आली. कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी संस्थेचे मुख्य मार्गदर्शक अॅड. मुकुंद जालनेकर हे होते. तर प्रमुख उपस्थिती डॉ. मीनाक्षीताई मोरे पॅथॉलॉजिस्ट, जिनी जावेद वाघ उद्योजिका व समाजसेविका तसेच प्रमुख अतिथी उषाताई विरक राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी नगरसेविका, प्रभाताई शिरसाट जिल्हाध्यक्षा वंचित बहुजन आघाडी, पुष्पाताई देशमुख शहराध्यक्षा, काँग्रेस पार्टी, सुमनताई गावंडे नगरसेविका भाजपा, शिवसेना सहसंपर्क प्रमुख ज्योत्स्नाताई चोरे, सहसंपर्क प्रमुख, कायदेविषयक सल्लागार अॅड. सुमित महेश बजाज, संघटनेच्या सचिव प्रा. सुनीता डाबेराव, संघटनेच्या जिल्हाध्यक्षा साधनाताई पाटील, प्रा. संजय देशमुख यांची उपस्थिती होती. तसेच परिक्षक म्हणून प्रा. दीपक गव्हाळ मराठी, प्रा. विजय अग्रवाल हिंदी, मोनिका शर्मा इंग्रजी, प्रा. नावेद अख्तर अब्दुल रशीद उर्दू आदी मान्यवर उपस्थित होते. गत महिनाभरापासून राज्यभरासह इतरही राज्यातील स्पर्धकांना उत्सुकता लाभलेल्या या स्पर्धेची सांगता आयएमए हॉल अकोला येथे सांगता झाली.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक स्पर्धा संयोजक प्रा. राहुल माहुरे यांनी केले. तर कार्यक्रमाची भूमिका संस्थाध्यक्ष संजय कमल अशोक यांनी विषद केली. स्पर्धेचा निकाल मुख्य परिक्षक प्रा. विजय अग्रवाल यांनी निकाल जाहीर केला. यामध्ये विलासराज दंदे यांच्यातर्फे रोख 10 हजार रुपये प्रथम क्रमांक प्रीती आप्पाराव मुसळे राजस्थान महाविद्यालय वाशिम, कमलताई अशोकराव देशमुख यांच्यातर्फे रोख 5 हजार रुपये द्वितीय क्रमांक कुमारी निकिता गोपाल जढाळ संत गजानन महाराज महाविद्यालय शेगांव जि. बुलडाणा व श्रीमती लताताई रामकृष्ण जाधव अकोला, डॉ.सीमाताई तायडे यांच्यातर्फे रोख 3 हजार रुपये तृतीय क्रमांक कल्पेश आत्माराम पारधी रत्नागिरी (कोकण) व दिवाकर नाना बडगुजर जळगाव (खान्देश) यांना विभागून देण्यात आले. तसेच भाषा निहाय प्रोत्साहनपर अन्सार उल्ला खान यांच्यातर्फे रोख 1 हजार रुपये क्रमांक इंग्रजी भाषा अनघा विश्वनाथ देशपांडे, अमित शर्मा यांच्या तर्फे रोख 1 हजार रुपये हिंदी भाषा समीय सदफ शौकत खान , स्व. मायाताई खेंडकर स्मृतीप्रित्यर्थ रोख 1 हजार रुपये उर्दू भाषा सय्यद आहसा सय्यद इक्बाल अली तर नितीन काटोले यांच्यातर्फे रोख 1 हजार रुपये मराठी भाषा विष्णू जाधव यांना प्रोत्साहनपर बक्षीसे देण्यात आली. तसेच सहभागी स्पर्धकांना प्रमाणपत्र देऊन गौरविण्यात आले. समारंभाकरीता प्रा.संतोष हुशे, उद्योजक विवेक मंत्री, सुवर्णकार एस.एस. खरोटे, सुवर्णकार भरत चांदवडकर, राजेश चंदनबटवे, अतुल बाळापुरे, कुंदन बोरकुटे यांनी सहकार्य केले. उपस्थित मान्यवरांनी आणि विजेत्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. कार्यक्रमाचे सूत्रसंचालन वैष्णवी हागोणे तर आभार विशाल नंदागवळी यांनी मानले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी अॅड. आकाश हराळ, चेतना गोयल, मीरा वानखडे, सुनीता टाले, प्रा.सुनीता बन्ने, अजिंक्य ढेवळे, मनीष देशमुख, पवन कवळकार, पंकज वाडकर, गौरव हिवाळे, रोहित वानखडे, रितेश खंडारे, मुन्ना लाले, वैभव कवळकार, पवन राऊत, आदेश शेंडे, प्रीती खोडे, दिव्या डुकरे, सुनीता देशमुख, अमित लोंढे, आदित्य बानवगडे, साक्षी कानकिरड, श्रेया पांडे, प्रतीक्षा लांजुळकर, सविता वारोकार, देशमुख समाज जागृती मंडळ यांनी अथक परिश्रम घेतले. कार्यक्रमाची सांगता राष्ट्रगीताने करण्यात आली.





