वर्हाड दूत न्यूज नेटवर्क
एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय, अकोला यांच्याकडून आदिवासी जमातीच्या लाभार्थ्यांसाठी विविध योजना कार्यान्वयीत करण्यात आल्या आहे. आदिवासी बांधवाना विविध योजनांचा लाभ देण्याच्या दृष्टीने त्यांच्याकडून 10 मार्चपर्यंत एकात्मिक आदिवासी विकास प्रकल्प कार्यालय येथे अर्ज मागविण्यात आले आहे.
विविध वैयक्तिक लाभाच्या योजना ह्या 85 टक्के अनुदानावर तुषार संच, काटेरी तार, खाद्य स्टॉल, शेळी गट, काटेरी तार लोखंडी एंगलसह, दालमिल, मोहफुल संकलनासाठी जाळी, ठिबक सिंचन, किराणा दुकान इ. सामूहिक व प्रशिक्षण योजना गट ब अंतर्गत एमएस-सीआयटी, मराठी-30 टंकलेखन, इंग्रजी-30 टंकलेखन, वैद्यकीय व अभियांत्रिकी प्रवेशपूर्व परीक्षेचे 45 दिवसाचे प्रशिक्षण, हलके वाहन चालविण्याचे प्रशिक्षण, नळ फिटींग व पाईप लाईन फिटींग प्रशिक्षण, एल.ई.डी. बल्ब, बॅटरी तयार करण्याचे प्रशिक्षण, कृषी माहिती तंत्रज्ञान प्रशिक्षण, मोबाईल रिपेरींगचे प्रशिक्षण, फर्निचर बनविण्याचे प्रशिक्षण, अकाऊंट असिस्टंट युसींग टॅली प्रशिक्षण, वस्तु व सेवा कर (GST) अकाऊंट असिस्टंटचे प्रशिक्षण, पर्यटन गाईडचे प्रशिक्षण, बँकींग अँड फायनान्स सर्व्हिसेस (सर्टीफिकेट कोर्स) चे प्रशिक्षण, आर्टिफिशियल इंटेलिजन्स तंत्रज्ञानाचा वापर करुन आधुनिक पद्धतीने भाजीपाला/हळद लागवडीचे प्रशिक्षण देऊन माती परीक्षण, पानाचा नमुना तपासणी, भाजीपाला रोपे व खते वाटप करुन वेळोवेळी निरीक्षण करणे, गट क अंतर्गत पोलीस भरतीपूर्व मार्गदर्शन शिबीर, फोम मालापासुन वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तुंना कुशन तयार करण्याचे प्रशिक्षण, युवतींना शिलाई मशीन व एब्रॉडरीचे प्रशिक्षण, पेपर प्लेट मेकींग प्रशिक्षण, रोजगार स्वयंरोजगार मिळण्यासाठी डेझर्ट कुलर बनविण्याचे प्रशिक्षण, ॲल्युमिअम सेक्शन पार्टीशनचे प्रशिक्षण, मातीपासुन मुर्ती तयार करण्याचे प्रशिक्षण, महिला व युवतींना कागदी पिशवी बनविण्याचे निवासी प्रशिक्षण, प्लॉस्टर ऑफ पॅरीस पासुन घराच्या छताला वेगवेगळ्या डिझाईन काढुन पी.ओ.पी.चे प्रशिक्षणांचा समावेश आहे.





