पारंपारिक प्रथेला फाटा देत मुलींनी वडिलांना दिला मुखाग्नी

0
221

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क

 अकोला :वडिलांच्या अचानक निधनामुळे मुलींनी दिला वडीलांना मुखाग्नी देवून पारंपारिक प्रथेला फाटा दिला. मुलींच्या हिंमतीची सर्वत्र प्रशंसा होत आहे. अकोला येथील जुने शहर भागातील रहिवाशी भावसार क्षत्रिय समाजातील लिलाधरसा वामनसा गोडले यांचे 21 फेब्रुवारीरोजी निधन झाले. त्यांच्या निधनाने गोडले परीवारातील दोन्ही मुली पोरक्या झाल्या. वडिलांना कोण खांदा देईल याची चर्चा सुरु असतानाच समाजातील काही ज्येष्ठ व्यक्तींनी पुढाकार घेवून लिलाधरसा गोडले यांच्या दोन्ही मुली पुढे आल्या. त्यांनी वडिलांना मुखाग्नी देण्याचा मानस व्यक्त केला. अखेर समाजातील प्रतिष्ठीतांच्या उपस्थितीत अंत्यविधी पार पडला.

Previous article60 गावांची पाणीटंचाईपासून कायम मुक्तता होणार
Next articleबाळासाहेब ठाकरे कृषी व्यवसाय व ग्रामीण परिवर्तन प्रकल्प

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here