भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे

0
187

वर्‍हाड दूत न्यूज नेटवर्क
भारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे
-निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांचे आवाहन
अकोला :अनुसूचित जाती,विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गासाठी राबविण्यात येणाऱ्या मॅटीकोत्तर शिष्यवृत्ती/शिक्षण फी,परीक्षा फी योजना व इतर ऑनलाईन योजनांचे शैक्षणिक वर्ष २०२१-२२ मधील अर्ज स्विकारण्यासाठी १४ डिसेंबर २०२१ पासून नवीन प्रवेशित व नूतनीकरणाचे विद्यार्थ्यांचे अर्ज भरण्यासाठी कार्यान्वित करण्यात आले आहे. सन २०२१-२२ मधील अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्याथ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडिबीटी महाएट डॉट जीआेव्ही डॉट ईन या महाडीबीटी पोर्टलच्या संकेतस्थळावर विद्यार्थ्यांचे अर्ज भरुन घ्यावे. तसेच महाविद्यालयात प्रवेशीत विद्यार्थ्यांना सन 2021-22 सत्रातील महाडिबीटी प्रणालीवर शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज भरण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी असल्याबाबत महाविद्यालय स्तरावरून अवगत करावे. तसेच महाविद्यालयानी जास्त प्रमाणात नोदणीकृत होतील याकडे लक्ष द्यावे. सन 2021-22 या शैक्षणिक सत्रातील शिष्यवृत्ती सन 2021-22 करीता अनुसूचित जाती, विमुक्त जाती भटक्या जमाती, इतर मागास वर्ग व विशेष मागास प्रवर्ग या प्रवर्गातील विद्यार्थ्यांचे शिष्यवृत्ती व इतर योजनांचे अर्ज महाडीबीटी प्रणालीवर अर्ज परत पाठविण्याची अंतिम मुदत 28 फेब्रुवारी 2022 असून याबाबत कार्यवाही करुन पात्र अर्ज सहायक आयुक्त समाज कल्याण यांचे लॉगीनला पाठविण्यात यावे. तरी जिल्हयातील सर्व प्राचार्यांनी आपल्या महाविद्यालयातील सर्व शिष्यवृत्तीधारक विद्यार्थ्यांना वरील योजनांचे दिलेल्या तारखेपर्यंत अर्ज भरण्यासाठी आपल्या स्तरावरून कळवावे असे आवाहन निवासी उपजिल्हाधिकारी प्रा. संजय खडसे यांनी केले आहे.

Previous articleअकोला परिमंडळातील एस.टी.कर्मचारी संपावर ठाम
Next articleसंत नरहरी महाराज सभामंडपाचे आ. रणधीर सावरकर यांचेहस्ते भूमिपूजन

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here