अकोला परिमंडळातील एस.टी.कर्मचारी संपावर ठाम

0
198

वर्‍हाडदूत न्यूज नेटवर्क
अकोला परिमंडळातील एस.टी.कर्मचारी संपावर ठाम
25 तारखेला हायकोर्टाच्या सुनावणीकडे लक्ष
आज मुंबई उच्च न्यायालयात एस.टी.कर्मचा-यांच्या विलीनीकरणाच्या प्रकरणात सुनावणी झाली. यावेळी न्यायालयाने पुढील सुनावणी येत्या 25 फेब्रुवारी रोजी ठेवल्याचे एस.टी.कर्मचा-यांनी सांगितले. उच्च न्यायालयाच्या निर्णयाकडे आमचे लक्ष लागले असून न्यायालयाच्या निर्णयानंतरच आमची भूमिका ठरवू असे आंदोलनकर्त्यांनी सांगितले. जोपर्यंत उच्च न्यायालयाचा अंतिम निर्णय येत नाही, तोपर्यंत संप सुरुच ठेवण्याचा निर्धार अकोला परिमंडळातील एस.टी.कर्मचा-यांनी व्यक्त केला. राज्य शासनात एस.टी.महामंडळाचे विलीनीकरण करण्यात यावे ही कर्मचा-यांची प्रमुख मागणी आहे.

Previous article” लाभले आम्हास भाग्य बोलतो मराठी जाहलो खरेच धन्य ऐकतो मराठी “…
Next articleभारत सरकार शिष्यवृत्ती व इतर योजनांचे विद्यार्थ्यांचे प्रलंबित अर्ज महाडीबीटी पोर्टलवर २८ फेब्रुवारीपर्यंत भरावे

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here