महानगरात निघाली मुनींश्री विशेषसागरजी यांची भव्य शोभायात्रा

0
175

जैन दर्शनात पंचकल्याणक ही मोठी पूजा
व-हाड दूत न्यूज नेटवर्क 
अकोला -प. पु. गणाचार्य, महामुनिराज श्री 108 विरागसागरजी यांचे परम शिष्य परमपूज्य वात्सल्य शिरोमणी श्रमण मुनी श्री 108 विशेषसागरजी गुरुदेव यांचे महानगरात आगमन प्रसंगी भव्य शोभायात्रा काढण्यात आली.
रविवारी मुनींश्री यांचे खडकी येथील रस्त्यावरून महानगरात आगमन झाले.यावेळी त्यांची बँड समवेत व मंगल कलशधारी महिला सोबत भव्य शोभायात्रा काढण्यात आली.यावेळी आ गोवर्धन शर्मा,गणेश पावसाळे,माजी नगरसेवक पंकज गावंडे, कौलखेडच्या श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिर समितीचे पदाधिकारी व महिला पुरुष वर्गाने मुनींश्री यांचे जोरदार स्वागत करीत त्यांचे पाद प्रक्षालन केले.ही भव्य शोभायात्रा खडकी,कौलखेड येथून तेथील श्री 1008 महावीर दिगंबर जैन मंदिरात येऊन येथे या शोभयात्राचे समापन करण्यात आले.
यावेळी मार्गात अनेक नागरिकांनी मुनींश्री यांचे स्वागत केले.महिलानी परिसरात रांगोळी काढून त्यांचे पूजन केले.मंदिरात मुनींसंघाने देवदर्शन करीत उपस्थित धर्मानुयायीना मार्गदर्शन केले.यावेळी मंदिर ट्रस्ट कमिटी,इंद्र परिवाराने पु मुनींश्रीच्या चरणी श्रीफळ अर्पण करीत अनुग्रह प्राप्त केला.या नंतर गुरुवर्य ने उपस्थित भाविकांना हितोपदेश दिला.आपल्या मार्गदर्शनात त्यांनी आत्मा,परमात्मा व अंतरात्माची परिभाषा प्रतिपादित केली.ते म्हणाले,प्रत्येक आत्मात परमात्मा बनण्याची योग्यता आहे.अगदी सामान्य व्यक्तीपण सत्संग व संतांच्या संगतीत परमात्म्यात परावर्तित होऊ शकतो.मुनींश्रीनी अनेक दृष्टांत सादर करीत संगती व दुसंगतीचा भेद प्रतिपादित केला.ते पुढे म्हणाले,जैन दर्शनात पंचकल्याणक पूजा सर्वोच्च।मानली जाते.या पावन पूजाविधी संदर्भात यावेळी माहिती देण्यात आली.
२३ ते २८ एप्रिल विश्वशांती उत्सवाचे आयोजन 
श्री महावीर पंचकल्याण महोत्सव व विश्वशांती उत्सवाचे आयोजन कौलखेड परिसरातील या मंदिरात आगामी दि 23 एप्रिल ते 28 एप्रिल दरम्यान आयोजित करण्यात येत असल्याची घोषणा यावेळी करण्यात आली.या उत्सवात सर्व धर्मानुयायी महिला पुरुष वर्गाने सहभागी होण्याचे आवाहन यावेळी करण्यात आले.संचालन पं रवींद्र जैन यांनी केले.यावेळी जैन समाज युवक संघ, आस्था महिला मंडळ,पद्मावती महिला मंडळ, जिनवाणी महिला मंडळ,श्रद्धा महिला मंडळाच्या सर्व महिला पदाधिकारी व भाविक पुरुष मोठ्या संख्येने उपस्थित होते.

Previous articleवीरस्त्री स्व. लताताई देशमुख स्मृती राज्यस्तरीय निबंध स्पर्धेचा बक्षीस वितरण सोहळा उत्साहात
Next article15 मार्च ते 25 मार्च पर्यंत भाजपाचे घर घर चलो अभियान

LEAVE A REPLY

Please enter your comment!
Please enter your name here